भवानी पेठेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाइन शिबिर…
सोलापूर दि ११ जुलै – प्रभाग क्रमांक एक भवानी पेठ मडडी वस्ती येथे शिवसेना सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन शिबिर घेण्यात आले याशिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या उपस्थित आणि जिल्हाप्रमुख संजय सरवदे यांच्या नियोजनाखाली करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण सरवदे शशिकांत शिंदे राजकुमार शिंदे शंकर भोसले संजय भोसले नारायण सरवदे राहुल गुरव अवलो मुजावर तानाजी घोगरे खंडू सरवदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते