शिवरायांच्या स्वराज्याला अभिप्रेत असणारे छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे उल्लेखनीय कार्य – नूतन उत्सव अध्यक्ष सी.ए सुशीलकुमार बंदपट्टे  !

छत्रपती शिवाजी मुस्लिम बिग्रेड यांच्यावतीने सुशील बंदपट्टे यांचा झाला सत्कार…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दी.३० जानेवारी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या अध्यक्षपदी सुशील बंदपट्टे यांचे  निवड झाल्याबद्दल,  मराठा सेवा संघ संचलित  छत्रपती शिवाजी मुस्लिम बिग्रेड  यांच्यावतीने  लक्ष्मी मार्केट येथील  हनुमान मंदिर जवळ त्यांचा हार घालून मतीन बागवान यांची हस्ते सत्कार करण्यात आला.

      दरम्यान, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोग विभाग वसीम बुऱ्हान यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी मतीन बागवान, इरफान शेख,  इरफान शेख, युनूस भाई बागवान,  शरीफ रचभारे, फायज मुनसी, यावेळी छत्रपती शिवाजी मुस्लिम बिग्रेडचे पदाधिकारी आदी  उपस्थित होते.

   तत्पूर्वी मराठा सेवा संघ संचलित, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूर यांच्या वतीने विविध मान्यवरांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे नुतन अध्यक्ष सुशीलकुमार बंदपट्टे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना हे गौरोवोद्गार काढले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य हे स्थापन करताना सर्व जाती धर्मांना सोबत घेतले आणि समान न्याय दिले, जाती पेक्षा कर्तृत्वाला संधी दिली न्यायी राजा म्हणून आजही गुणगान केले जाते. आज मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड पण सर्व जाती धर्माच्या लोकांना सन्मान करण्याच काम करत आहेत.असेही बंदपट्टे यावेळी म्हणाले.

यावेळी C. A. सुशील बंदपट्टे नुतन अध्यक्ष शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर , वसीम खाजा बुरहान सदस्य – महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई ,राजा बागवान, ओघ फौंडेशन मुंबई “जिवनगौरव” पुरस्कार प्राप्त, इरफान शेख मुस्लिम आरक्षणासाठी सोलापूर ते मुंबई पायी यात्रा , शफीक रचभरे उमरा या पवित्र यात्रेस रवाना या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

मान्यवरांचा सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष इम्तियाज म.उस्मान मर्चंट यांच्याहस्ते फय्याज मुन्शी लक्ष्मी मार्केट येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाचे आयोजन हाजी मतीन बागवान शहराध्यक्ष छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूर यांनी केले याप्रसंगी राजू हुंडेकरी, बशीर सय्यद, माजी नगरसेवक हारुण शेख, जावेद बद्दी, तन्वीर गुलजार, कादर भागानगरी, कय्युम मोहळकर आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *