श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने पालिका आयुक्तांना दिले विविध मागण्यांचे निवेदन ;

श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन…

श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी महापालिका आयुक्त यांना निवेदन देताना…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.४ एप्रिल

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मजबुतीकरण आणि सुशोभिकरणाचे काम बऱ्याच दिवसांपासून अर्धवट अवस्थेत आहे. ते काम येत्या ३१ मे पूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी श्रीशिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्यावतीने निवेदनाद्वारे सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्याकडे केली आहे.

    छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे मजबुतीकरणाचे काम चालू आहे. यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये सदर काम १९ फेब्रुवारी २०२५ पूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते. परंतु तसे झाले नाही. काम पूर्ण करण्यास विलंब झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम अपूर्ण राहिल्यामुळे शिवभक्तांमध्ये प्रचंड नाराजी आहे. तरीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिवभक्तांनी मोठ्या सामंजस्याने साजरी केली. येत्या ६ जून रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस असून सदर काम वेळेत पूर्ण करण्यात यावे, अशी तमाम शिवप्रेमींची इच्छा आहे. तरी सदर काम पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि ठेकेदारास करावेत, अशी मागणी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी आयुक्तांनी नगर अभियंता यांना सदरचे अर्धवट काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले, अशी माहिती उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी दिली .सदर काम दि. ३१ मे २०२५ पूर्वी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशाराही यावेळेस देण्यात आला.

     यावेळी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर  ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे, उत्सव अध्यक्ष सीए सुशील बंदपट्टे,श्रीकांत डांगे, श्रीकांत घाडगे, आप्पा सपाटे, तात्या वाघमोडे, विजय भोईटे, अंबादास शेळके, दिनकर जगदाळे, विश्वनाथ गायकवाड, सचिन स्वामी, प्रकाश ननवरे, गणेश डोंगरे, नागेश वडणे, देविदास घुले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *