प्रशासनाच्या “जय शिवाजी जय भारत ” पदयात्रेचे मुस्लिम ब्रिगेडकडून पुष्पवृष्टीच्या माध्यमातून स्वागत 

जिल्हा प्रशासनाच्या “जय शिवाजी जय भारत ” पदयात्रेचे मुस्लिम ब्रिगेडकडून पुष्पवृष्टीच्या माध्यमातून स्वागत

हम सब एक है क्या दिल्या घोषणा ! काढली शिव एकता रॅली…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१९ फेब्रुवारी

छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ व्या जयंती उत्सव निमित्त केंद्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये “जय शिवाजी, जय भारत” पदयात्रा काढण्याचे आदेश दिले आहेत. या उपक्रमांतर्गत सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने नवीन जिल्हाधिकारी कार्यालय ते रंगभवन उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. यापदयात्रेचे मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान आणि मुस्लिम मावळ्यांनी १०० किलो फुलांच पुष्पवृष्टी करुन स्वागत करण्यात आले.

    यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस आयुक्त राजकुमार, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, निवासी उप जिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, प्रांताधिकारी सदाशिव पडदूने, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांच्यासह प्रशासनातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेत माजी महापौर आरिफ शेख, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष म शफीक रचभरे कॅप्टन शफीक, मुबीन सय्यद, अल्ताफ लिंबूवाले,मराठा सेवा संघाचे राम गायकवाड अविनाश गोडसे, मुस्लिम ब्रिगेडचे राजू हुंडेकरी , मौलाना इरफान,बशीर सय्यद, हारुण शेख,  जावेद बद्दी, तन्वीर गुलजार, रिजवान शेख सर, कादर भागानगरी, कय्युम मोहळकर, रिजवान दंडोती, तन्वीर शेख, बाबा शेख, एजाज बागवान, मक्सूद शेख सर,वाहिद शेख, हारिस शेख, खाशिम बेलीफ, रुस्तुम शेख, इरफान शेख, खलील कादरी, रिजवान पैलवान आदी पदाधिकारीसह हजारो विद्यार्थी, नागरिक यांची जय शिवाजी जय भारत पदयात्रेत सहभागी झाले होत.

छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड संघटनेतर्फे शिव एकता रॅलीचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या सैन्यामध्ये मुस्लिम मावळ्यांना देखील मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेतले होते मोठमोठ्या पदावर मुस्लिम मावळे तैनात होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा दृष्टिकोन हा धर्म धर्म समभाव आणि देश एक संघ प्रेरित होता. शिवाजी महाराज यांची आठवण कायम स्मरणात राहावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड च्या वतीने शिव एकता रॅलीचे आयोजन केले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यातील विविध मुस्लिम सरदार अधिकारी यांची नावे या निमित्ताने समाजाला कळण्यासाठी विविध फलक घेऊन त्याची माहिती देण्यात आली.

– मतीन बागवान, शहराध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड सोलापूर शहर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *