श्रीशिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट… उत्सव मिरवणुकीसाठी लागणारे परवाने देण्याचे आयुक्तांनी दिले आश्वासन

श्रीशिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट…

शिवजयंती मिरवणुक परवानगीसाठी झाली सकारात्मक बैठक !

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१३ फेब्रुवारी 

अखंड महाराष्ट्राचे दैवत, जाणता राजा, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने (दि.१९) फेब्रुवारी रोजी उत्साहपूर्ण वातावरणात काढण्यात येणाऱ्या  विविध मंडळाच्या मिरवणूक संदर्भात शहर पोलीस आयुक्तालय येथे बैठक पार पडली.

 

       दरम्यान, या बैठकीत शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने काढण्यात येणारी भव्य दिव्य मिरवणूक लक्षवेधी ठरत असते. सदरच्या मिरवणुकीसाठी लागणारे विविध प्रकारचे परवाने, आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच विविध परवानगीसाठी येणाऱ्या अडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली, येणाऱ्या दोन ते तीन दिवसात मंडळांना मिरवणुकीसाठी परवानगी मिळेल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले,

         सर्व मंडळांनी मिरवणूक परवानगी संदर्भात कोणतीही काळजी करून नये सर्व मंडळांना मिरवणुकीसाठी परवानगी मिळणार असून सर्व मंडळांनी उत्साही वातावरणात  नियमांचे पालन करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करावी असे आवाहन शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

      यावेळी मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी पद्माकर काळे, पुरूषोत्तम बरडे,  दिलीप कोल्हे, उत्सवाध्यक्ष सीए.सुशील बंदपट्टे, नरेंद्र काळे, संजय शिंदे, सुनील रसाळे, महेश हनमे, सचिन स्वामी, वैभव गंगने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *