न भूतो न भविष्यती पारंपरिक वेशभूषा, भगवे फेटे, परिधान करत महिलांनी घेतला उत्स्फूर्त प्रतिसाद !
रणरागिणींच्या बुलेट शिवशोभा यात्रेने वेधले लक्ष

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१६ फेब्रुवारी
जाणता राजा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दृष्टीक्षेपात आली आहे. यंदा जयंतीचे औचित्य साधून श्रीशिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांच्या संकल्पनेतून शिवशोभा यात्रेचे आयोजन करणयात आले होते. रविवारी सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजी महाराज चौकात पारंपरिक वेशभूषेत महिला दुचाकी सह शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी जमू जमल्या, यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने महिलांना भगवे फेटे बांधण्यात आले, यावेळी छत्रपती संभाजी महाराज चौक येथील संभाजी महाराजांचे पूजन करून शिभयात्रेस सुरुवात करण्यात आली, ही यात्रा छत्रपती संभाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेकॅनिक चौक, नवी पेठ, राजवाडे चौक, चौपाड, मार्गे डाळींबी आड शिंदे चौक पर्यंत काढण्यात आली, शिवजयंती निमित्त महिलाची पारंपरिक वेशभूषेत आणि भगवे फेटे परिधान करून बाईक रॅली पहिल्यांदाच निघाल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती,
दरम्यान, शोभायात्रा शिंदे चौक येथे समाप्त झाल्यानंतर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या शिवमूर्तीची आरती महिलांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केला. यंदाच्या वर्षी शिवजयंती निमित्त पहिल्यांदाच अशी शोभायात्रा निघाल्याने महिलांनी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांचे आभार मानले. आणि प्रत्येक वर्षी अशीच शोभायात्रा काढण्यात यावी अशी इच्छा व्यक्त केली.शोभयात्रेचे पहिलेच वर्ष असून महिलांनी मोठया प्रमाणात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याने उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे, उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे, राजन जाधव, पुरुषोत्तम बरडे,लहू गायकवाड, प्रकाश ननवरे, अंबादास शेळके, बाळासाहेब पुणेकर, महेश हनमे, सचिन स्वामी, जेलपेश घुले, देविदास घुले, बसवराज कोळी, तुषार गायकवाड, कृष्णा बुरळे सोमनाथ बनसोडे, राहुल मुद्दे, सिद्धाराम पाटील, मनीष अलकुंटे, शुभम अलकुंटे यांच्यासह शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला पोलिसांचा सन्मान
शिवशोभायात्रेत शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने बंदोबस्त साठी असलेल्या महिला पोलिसांचा देखील फेटा बांधून सन्मान केला. त्याच प्रमाणे शिवशोभा यात्रेत पारंपारिक वेशभूषा परिधान केलेल्या महिलांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रथम द्वितीय आणि तृतीय असे क्रमांक काढण्यात येणार आहे.
घरा घरात शिवराय
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती घराघरात साजरी केली जावी. महाराजांचे विचार घरा घरात पोहोचणे आवश्यक आहे. या माध्यमातून बालकांना शिकवण द्यावी.
उज्वला साळुंखे,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त यंदा प्रथमच महिलांची शिवशोभा यात्रा काढण्यात आली. त्यामध्ये महिलांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून छ्त्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. दरवर्षी सदरची शिवशोभा यात्रेचे आयोजन करण्यात यावे.
चारुशीला जगदाळे,