अबू आझमीची तिरडी काढत “त्या” वक्तव्याचा केला निषेध…

अबू आझमीची तिरडी काढत “त्या” वक्तव्याचा केला निषेध…

शिवपुत्र छत्रपती सांभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला रोष…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज, 

सोलापूर, दि.६ मार्च

राम नाम स्त्य है…अबू आजमीचे करायच काय खाली मुंडीवर पाय च्या घोषणानी दणाणला परिसर…औरंग्याची औलाद अबू आजमीची तिरडी काढत छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अबू आझमीने केलेल्या ” त्या” वक्तव्याचा निषेध केला. सोलापूर शहरातील हॉटेल अंबेसिटर ते जुना पुना नाका स्मशानभूमी पर्यंत तिरडी काढत निषेध नोंदवला.

 

    दरम्यान, अबू आझमी यांच्या वक्तव्यच्या विरोधात तिरडी काढत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या अबू आझमीवर गुन्हा दाखल करून मोक्का गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी मंडळाच्या वतीने करण्यात आली. यावेळी राहुल दहिहंडे,राजा गेजगे,संदीप चेळेकर,लोकेश इरकशेटी,पवन आलुरे,वीरेश कलशेटी,तुषार अर्जुन,बबलू सावंत आदी शिवभक्त उपस्थित होते.

गनिमी कावाणे आंदोलन करणार  

औरंगजेबाच्या औलादी अबू आजमीच पार्सल पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानला पाठवावा. अन्यथा येणाऱ्या काळात अबू आजमी महाराष्ट्रात जिथं जिथं जाईल तिथे आम्ही सर्व शिवभक्त त्याच्या विरोधात गनिमी कावाणे आंदोलन करणार  

– राम जाधव,राज्यसमनव्यक-मराठा क्रांती मोर्चा संस्थापक-शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *