चेतन नरोटे यांनी घतली भावनिक साद ! भाषण करताना गहिवरले ….

चेतन नरोटे यांनी घतली भावनिक साद ! भाषण करताना गहिवरले….. मानले शिंदे फॅमिलीचे आभार …

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२९ ऑक्टोंबर – सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चेतन नरोटे यांनी आज भव्य सभा घेऊन मतदारांना मतदान करण्याचे जाहीर आवाहन केले. याप्रसंगी त्यांना गहिवरून आले. डोळ्यात आनंदाश्रू घेऊन त्यांनी खासदार प्रणिती शिंदे तसेच शिंदे फॅमिलीचे आणि मतदारांचे आभार मानले.

   दरम्यान सकाळी दहा वाजता रामलाल चौक येथे चेतन नरोटे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर खासदार प्रणिती शिंदे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, शहर उत्तरचे उमेदवार महेश कोठे, सुधीर खरटमल, पुरुषोत्तम बर्डे, यू.एन.बेरिया आदींची उपस्थिती होती.

  यावेळी खा.प्रणिती शिंदे यांनी भाजपवर जोरदार प्रहार करत भाजप सरकारने महिलांना पैसे देऊन मत विकत घेण्याचा घाट घातला आहे. मध्य मध्ये वेगळी गेम करण्याचा प्रयत्न भाजपने केला.परंतु तो गेम आता फसला आहे. त्यामुळे मतदारांनी जागृत राहून मतदान करण्याचे आवाहन केले.

त्याच प्रमाणे महेश कोठे यांनी देखील भाजपवर टीका करताना सुशील कुमार शिंदे यांनी केलेली कामे आम्ही केल्याचे भासवून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे.तो फसवा प्रकार घडू नये यासाठी मतदार जागरूक रहा असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *