शालेय साहित्य वाटप उपक्रम ; चंद्रनील सोशल फाउंडेशन
शाळा हे केवळ शिकण्याचे घर नाही तर ते प्रत्येक मुलाचे दुसरे घर आहे…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.३ मे
शाळेचे ते दिवस कोणाला आठवणार नाहीत. जर मी असे म्हंटले की शाळा ही एकमेव जागा होती जिथे चांगले मित्र होते, चांगले शिक्षक होते आणि तेच सर्वोत्तम ठिकाण होते, तर ते चुकीचे ठरणार नाही कारण कितीही मोठे महाविद्यालय, विद्यापीठ, कंपनी असो शाळाच असे एक ठिकाण आहे जिथे कोणतीही अडचण नाही, जबाबदारी नाही, चुकीचे मित्र नाहीत, वाईट जग नाही. फक्त निरागसता आणि मजा…….अश्याच अनेक सुंदर क्षणांसाठी मुलांनी शाळेला गेल पाहिजे आणि कुठल्याही अडचणीशिवाय…. म्हणूनच चंद्रनील सोशल फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी असंख्य गरजू मुलांना शालेय साहित्याच वाटप करण्यात येत.
यंदाच्या वर्षी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिवस तथा माझे वडील कै श्री चंदू भीमशा बंदपट्टे यांच्या जन्मदिनास्मरणार्थ २००० मुलांना शालेय साहित्य वाटपाचा संकल्प चंद्रनील सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला असून तमाम गरजूवंतानी चंद्रनील सोशल फाउंडेशन च्या कार्यालयास दिनांक ०३/०५/२०२५ ते दिनांक २०/०५/२०२५ पर्यंत आवश्यक कागदपत्रांसहित भेट द्या आणि नाव नोंदणी करून घ्या. असे आवाहन करण्यात आले आहे.