सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन…
सोलापूर व्हिजन प्रतिनिधी
राज्यातील विक्रमी उलाढालीसाठी प्रसिद्ध असलेल्या श्रीसिद्धेश्वर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान, नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी या मोफत शिबिरांचा नागरिकांनी लाभ घेतला. या शिबिरात रक्तदान शिबिरात १२५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर आरोग्य शिबीरात ३०० जणांनी तर नेत्र तपासणीमध्ये २०१ जणांनी तपासणी केली.