आषाढी वारीसाठी पंढरपूर रेल्वे स्टेशन सज्ज….
मध्य रेल्वेच्या सोलापूर रेल्वे विभागाचे आषाढीवारी साठी योग्य नियोजन….
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि १४ जुलै – मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने आषाढी यात्रेसाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक निरज कुमार दोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर रेल्वे स्टेशनचे सुसज्ज नियोजन केले आहे. यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविकांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये यासाठी रेल्वेने युद्ध पातळीवर व्यवस्था केलेली आहे. रेल्वेतील प्रत्येक विभागाने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या.
सर्व वारकरी भाविकांना पंढरपूर मध्ये येण्यासाठी महाराष्ट्र आणि इतर राज्यामधून विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था दिनांक १२ जुलै पासून ते २१ जुलै २०२४ पर्यंत करण्यात आलेली आहे.
दरम्यान प्लेटफॉर्म आणि फूट ओव्हर ब्रिज व्यवस्थापन करण्यासाठी आरपीएफ आणि वाणिज्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आले आहे. पर्याप्त अग्निशामक ची व्यवस्था स्थानिक नियंत्रण कक्ष आणि अंबुलन्स ची व्यवस्था करण्यात आली आहे स्थानिक रुग्णालयाबरोबर टायप करून व्यवस्था, स्टेशनवर डॉक्टर्स आणि बूथ्स नियुक्त, अतिरिक्त सीएचआय (हेल्थ निरीक्षक) आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केले असून त्वरित कचरा निर्मूलनाची व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे.
प्रत्येक दिवशी विशेष मुख्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली नियोजन केले जात आहे. तरी आषाढी वारीला आलेल्या सर्व भाविकांनी शांततेच्या आणि सुरक्षेच्या पालन करून, कमीत कमी सामानासह रेल्वे प्रवास करावा आणि आपल्या मौल्यवान वस्तूची काळजी घेऊन वारी करावी असे आवाहन रेल्वे प्रशासना कडून करण्यात आले आहे.
सोलापूर रेल्वे विभागाने केलेले नियोजन
नियमित तिकीट खिडक्या वगळता अतिरिक्त दहा तिकीट खिडक्याची व्यवस्था , रेल्वे स्थानकात‘मदत सहाय्यता केंद्र’ची व्यवस्था , अतिरिक्त शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अतिरिक्त पाण्याचे टॅप पाणी टँकर २००० लिटर क्षमतेसह व्यवस्था , अतिरिक्त मोबाइल शौचालय , अतिरिक्त २४ तास सफाई कर्मचाऱ्यांच्या व्यवस्था , कोच सफाईची , वॉटर प्रूप सुरक्षित टेंट्सची व्यवस्था , रेल्वे स्थानक परिसरात सीसीटीव्ही , स्थानिक नियंत्रण कक्ष स्टेशन व्यवस्थापक कार्यालयात असणार , नियमित सूचना, २४ तास अनाउंसमेंट असणार आहे , पाणी आणि शौचालयांसाठी मराठी आणि हिंदीतुन साइन बोर्ड लावण्यात आले आहेत, अतिरिक्त फॅन आणि मोठ्या प्रकाराचे लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे.