महाराष्ट्र चेंबर व विकास मंच तर्फे मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना दिले निवेदन…..
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २७ जुलै – सोलापुर रेल्वे स्टेशन पंच तारांकीत दर्जाचे आधुनिक स्टेशन बनवण्यासाठी ४८५ कोटीची कामे सुरू आहेत तसेच कुमठे ते टिकेकरवाडी दरम्यान ८ पदरी ट्रॅक देखभाल दुरुस्तीच्या कामाची पाहणी आणि आढावा घेतला.
यावेळी सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचा भाग ठरणार आहे,त्यामुळे सर्व सोलापूरकरातर्फे मैसुरी पगडी,मोतीमाला बुके देऊन केतन शहा सहकाऱ्यांनी सरव्यवस्थापक रामकरण यादव , सोलापूर रेल्वे विभागीय व्यवस्थापक निराजकुमार दोहरे यांचा सन्मान केला,
सोलापूरकरांच्या प्रलंबित मागण्याचे निवेदन….
सदरच्या निवेदनात सोलापूर ते नागपूर,गोवा, दिल्ली हैद्राबादसाठी नवीन गाडी सोडावी , सोलापूर येथून सुटणाऱ्या व मुक्कामाला येणाऱ्या सर्व गाड्या प्लॅटफॉर्म क्र एक वरूनच सुटाव्या व एक नंबर वरच याव्यात, जाहीर केलेली पुणे ते सिकंदराबाद वंदेभारत त्वरित सुरू करावी, जाहीर केलेली हुबळी ते सिकंदराबाद वंदे भारत सुरू करावी ,हुतात्मा एक्सप्रेस ह्या गाडीस साधे तिकीट उपलब्ध करून घ्यावे, हुबळी ते हैद्राबाद पहाटेची गाडी होटगी स्टेशन पर्यंत येऊन परत हैद्राबाद कडे जाते, ती गाडी सोलापूरला आणून मगच हैदराबदकडे सोडावी,
वंदेभारात ही गाडी मुंबई येतून दुपारी चार ऐवजी पाच वाजता सोडावी जेणे करून रात्री सिद्धेश्वर गेल्यावर प्लॅटफॉर्म क्र एक वर घेता येईल, कोविड दरम्यान बंद केलेल्या सर्व गाड्या पुन्हा सुरू कराव्यात , प्लॅटफॉर्म क्र पाच व सहा येथे सरकता जिना करणे गरजेचे आहे, सर्व गाड्याचा पार्सल डबा उघडण्यात यावा जेणे करून सोलापूर जिल्ह्यतील शेतकऱ्यांचा नाशवंत माल मेट्रो सिटीला वेळेवर पोहचेल, अनधिकृत फळ , खाद्यपदार्थ विक्रेत्यांना स्टेशनवर प्रवेश नसावा.
याप्रसंगी केतन शहा,योगीन गुज्जर,विजय जाधव , आनंद पाटील,राजू बिराजदार उपस्थित होते.