अनाधिकृत रेल्वे प्रवाशांवर कारवाई : एक महिन्याच्या कालावधीत ९.०४ लाख प्रकरणांमधून ६३.६२ कोटी रुपयांचा महसूल केला जमा.
सोलापूर व्हिजन – मध्य रेल्वेने सर्व बोनाफाइड रेल्वे प्रवाशांना आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा देण्यासाठी तसेच विना तिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी उपनगरीय, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये सखोल तिकीट तपासणी केली. विना तिकीट प्रवासामुळे होणारे उत्पन्नाचे नुकसान आणि प्रवासादरम्यान बोनाफाइड प्रवाशांना येणाऱ्या अडचणींवर वरिष्ठ अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मे-२०२४ या महिन्यात, मध्य रेल्वेने अनधिकृत आणि अनियमित प्रवाशांच्या ४.२९ लाख प्रकरणांमधून २८.४४ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला, जो या महिन्याच्या २७.७४ कोटी रुपयांच्या समानुपातिक महसूल उद्दिष्टापेक्षा २.५४% जास्त आहे. एप्रिल ते मे-२०२४ या कालावधीसाठी विभागनिहाय महसूल आणि प्रकरणांचे तपशील खालील प्रमाणे आहेत.मुंबई विभागातील ४.०७ लाख प्रकरणांमधून रु.२५.०१ कोटी. भुसावळ विभागातील १.९३ लाख प्रकरणांमधून रु. १७.०७ कोटी . नागपूर विभागातील १.१९ लाख प्रकरणांमधून रु.७.५६ कोटी. सोलापूर विभागातील ५४.०७ हजार प्रकरणांमधून रु.३.१० कोटी. पुणे विभागातील ८३.१० हजार प्रकरणांमधून रु. ६.५६ कोटी. मुख्यालयाला ४६.८१ हजार प्रकरणांमधून रु.४.३० कोटी महसूल प्राप्त झाले. मध्य रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन करीत आहे.