सोलापुरात अमित शहा विरोधात उद्धव ठाकरे शिवसेनेची निदर्शने…

काश्मीर येथे जवानांवर होणाऱ्या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या अमित शहा यांचा राजीनामा घ्या…

सोलापूर व्हिजन 

सोलापूर दि १९ जुलै – भारतीय जवानांवर 78 दिवसात 18 वेळा काश्मीर मध्ये हल्ले झाल्याच्या निषेधार्थ सोलापुरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

                      सोलापुरातील चार हुतात्मा चौकात करण्यात आलेल्या निदर्शनावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीय.काश्मीर मध्ये जवानांवर होणाऱ्या हल्ल्याला अमित शहा हे जबाबदार असून तात्काळ पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी यावेळी शिवसैनिकांकडून करण्यात आलीय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दत्ता वानकर, शहरप्रमुख महेश धाराशिवकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना देशाचे जवान तसेच अधिकारी शहीद होत आहेत. गेल्या 78 दिवसात अनेक हल्ल्यांमध्ये जवान तसेच अधिकारी शहीद होत असून याकडे केंद्र सरकारचे तथा निष्क्रिय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुर्लक्ष होत आहे. बोल घेवड्या पंतप्रधानांनी शहा यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे.

           यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रताप चव्हाण विजय पुकाळे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *