शहरात फ्रेंडशिप डे चा उत्साह ; friendship day celebrate at Solapur city
मैत्रिणीच्या मनगटावर बांधला मैत्रीचा धागा…
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि ४ ऑगस्ट – ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे मोठ्या उत्साहा साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने सोलापूर शहरात फ्रेंडशिप डे चा उत्साह दिसून आला. मैत्रिणींनी एकमेकींच्या मनगटावर फ्रेंडशिप बँड बांधून फ्रेंडशिप डे च्या शुभेच्छा दिल्या.
सोलापूर शहरातील नवीपेठ या बाजारपेठेत फ्रेंडशिप डे निमित्त विविध प्रकारचे परीक्षे बँड विक्रीसाठी दाखल झाले होते. हे फ्रेंडशिप बँड खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये कॉलेज तरुणींनी एकच गर्दी केली होती. पंधरा रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंतचे आकर्षक आणि वैविध्यपूर्ण असे फ्रेंडशिप बँड तरुणींना आकर्षित करत होते. यावेळी कॉलेजच्या युवतींनी फ्रेंडशिप बँड चे बंडल खरेदी करून एकमेकींच्या मनगटावर बांधून मैत्री दिवसाच्या शुभेच्छा दिल्या…
प्रत्येकाच्या जीवनामध्ये मैत्रीचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांची मैत्री जगविख्यात आहे. याच मैत्रीचे उदाहरण सर्वत्र दिले जाते. अशी मैत्री प्रत्येकाची असावी अशी भावना प्रत्येकाच्या मनामध्ये व्यक्त होते.
हीच भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे फ्रेंडशिप डे होय. या दिवशी कॉलेजचे तरुण-तरुणी एकमेकांना फ्रेंडशिप डे चा बँड बांधून फ्रेंडशिप डे निमित्त शुभेच्छा देतात तसेच हा दिवस साजरा करण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये देखील हा उत्सव मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो.
फ्रेंडशिप डे निमित्त बँड घेण्यासाठी तरुण-तरुणींची गर्दी…..
फ्रेंडशिप डे निमित्त दरवर्षी विविध प्रकारचे बँड बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी दाखल होतात. साध्या बँड पासून ते चांगल्या दर्जाचे बँड यामध्ये असतात. साधारणपणे 15 रुपयापासून ते पन्नास रुपये पर्यंत बँडचे दर आहेत. महाविद्यालयाचे तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात बँड खरेदी करतात आणि उत्सव साजरा करतात. यंदाच्या वर्षी देखील फ्रेंडशिप डे निमित्त बाजारपेठेत कॉलेजच्या मुलांची वर्दळ होती.
– फ्रेंडशिप बँड विक्रेते , नवीपेठ.
मोठ्या स्वरूपात फ्रेंडशिप डे साजरा करतो……
फ्रेंडशिप डे अर्थात मैत्रीचा दिवस आम्ही मोठ्या स्वरूपात साजरा करतो. आम्ही सर्व मैत्रिणी एकमेकींच्या हातावर बँड बांधून फ्रेंडशिप डे निमित्त शुभेच्छा देऊन हा दिवस उत्साहात साजरा करतो. शहरातील विविध हॉटेलमध्ये फ्रेंडशिप डे निमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले जाते त्या ठिकाणी फ्रेंडशिप डे हा दिवस साजरा करतो.
– कॉलेज युवती.