शंभर जन्मठेप, शंभर सामाजिक उपक्रम या कार्यक्रमांतर्गत ; शंभर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप…
विद्यार्थ्यांनी मोठ्या उच्च पदावर पोहचण्यासाठी अथक प्रयत्न करावेत एडवोकेट – प्रदीपसिंह राजपूत , सोलापूर जिल्हा सरकारी वकील तथा सीबीआय विशेष वकील
सोलापूर व्हिजन प्रतिनिधी –
सोलापूर दि २४ जुलै – डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम सामाजिक बहुद्देशीय संस्था संचलित बिनभिंतीची शाळेच्या वतीने शंभर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शंभर जन्मठेप, शंभर सामाजिक उपक्रम या उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला. सदरचा कार्यक्रम कैकाडी समाज मारुती मंदिर, उत्तर कसबा सोलापूर येथे घेण्यात आला.
शंभर जन्मठेप, शंभर सामाजिक उपक्रमाची सुरुवात मंदिरातील देवतांची पूजा करून झाली. यानंतर एडवोकेट प्रदीपसिंह राजपूत यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा फेटा श्रीफळ व हार घालून सत्कार करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांना एक कंपास, पेन्सिल, शॉपनर, रबर, पाण्याची बाटली, वह्या एडवोकेट प्रदीपसिंह राजपूत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना देण्यात आले.
दरम्यान एडवोकेट प्रदीपसिंह राजपूत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात मोठ्या पदावर जाण्यासाठी नेहमी अथक परिश्रम, मेहनत करून मिळवावेत. आई-वडिलांचा, गुरुजनांचा, मोठ्या लोकांचा मान सन्मान राखावा. आपले आरोग्य चांगले राखावे. अनेक क्रीडा प्रकारात भाग घ्यावा. वाचनाची सवय लहानपणापासूनच लावावी. डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम सामाजिक संस्थेने केलेल्या कार्याबद्दल कौतुक करून संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष गणेश माने यांनी बोलताना म्हणाले की, एडवोकेट प्रदीपसिंह राजपूत सरकारी वकील म्हणून गेल्या सहा वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी आपले कामकाज प्रामाणिकपणे व निपक्षपणे चालवून शासनास व गोरगरीब जनतेला न्याय मिळवून दिला. आत्तापर्यंत त्यांनी शंभर जन्मठेप शिक्षा देण्यात मोलाचे योगदान दिले आहे. प्रदीपसिंह राजपूत यांचे कार्य विधी क्षेत्रासाठी प्रेरणादायी आहे
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सोलापूर शहर कैकाडी समाजसेवा मंडळाचे प्रमुख किसन जाधव,अपरिचित सामाजिक संघटनेचे अध्यक्ष मयूर गवते , एडवोकेट स्वप्निल शिंदे , संस्थेचे अध्यक्ष गणेश माने , वसीम शेख , अनिल कमले, मोहन कासार आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.