पाच आमदारांच्या पोस्टरला जोडे मारत कोळी समाजाचे आंदोलन
जातीच्या दाखल्यांचे वाटप न झाल्यास मुख्यमंत्र्यांना आषाढीच्या महापुजेपासून रोखण्याचा दिला ईशारा
सोलापूर दि ३० जून – जातीचे दाखल्यावरून कोळी समाज आक्रमक भूमिकेत आहे. कोळी समाजाला जातीचे दाखले मिळत नसल्याने असंख्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच समाजातील विविध घटकांना याचा मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. सर्व कागदपत्रे आणि 1950 सालापूर्वीचे पुरावे असताना देखील कोळी समाज विविध प्रकारच्या सुविधांपासून वंचित राहत आहेत. कोळी समाजाला जातीचे दाखले मिळत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत कोळी समाजाची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळणार होता मात्र काही आदिवासी आमदारांनी त्याबैठकीला विरोध करत ती बैठक रद्द केली.
दरम्यान सदरची बैठक जाणून बुजून रद्द केल्याच्या निषेधार्थ सोलापुर शहरात जिल्हाधिकारी कार्यालयसमोर त्या पाच आमदारांच्या पोस्टला जोडे मार आंदोलन करण्यात आले. येणाऱ्या पुढील काळात तात्काळ जातीच्या दाखल्यांचे वाटप न झाल्यास मुख्यमंत्र्यांना आषाढीच्या महापुजेपासून रोखू असा इशारा यावेळी देण्यात आलाय. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे झालेल्या आंदोलनात आ.मंजुळा गावीत, आ.किरण लहामटे, आ.आमशा पाडवी, आ.हिरामण खोसकर, आ.सुनील भुसारा यांच्या पोस्टरला जोडे मार करत कोळी समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.या आमदारांच्या विरोधात प्रचार करून यांना विधानसभा निवडणुकीला पाडू असा इशारा यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे राज्य अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिला आहे. यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे पदाधिकारी सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते.