भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ९२ जणांचे रक्तदान, समाजसेवेचा आदर्श उपक्रम

भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ९२ जणांचे रक्तदान, समाजसेवेचा आदर्श उपक्रम

सोलापूर व्हिजन 

सोलापूर, दि.२९ मार्च

दरवर्षीप्रमाणे यंदाही जिझस ख्राईस्ट गॉस्पल सोसायटी यांच्या वतीने ख्रि.पा.राजू जंगम यांच्या स्मृती दिनानिमित या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून नगरसेवक चेतन नरोटे, नगरसेवक प्रा. नरसिंग असादे, संजय हेमगड्डी, हणमंतू सायबोलू, समर्थ मोठे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

  या रक्तदान शिबिराला रक्तदात्याचा व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल ९२ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत मानवतेचा संदेश दिला.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक सेवक, पदाधिकारी व स्वयंसेवकांनी मोठे योगदान दिले. अशोक तंबोळू, संजीव मोरे, जॉन दिनकर, निरंजन उजागरे, सुरेश

चर्च पदाधिकाऱ्यांमध्ये सागर तंबोळू, अशोक तंबोळू, परेश कुणशीकर, लाजर सातलोलू, देवपुत्र सायबोलू, बाळू मोटपेरोलू, संदेश जंगम यांचे विशेष सहकार्य लाभले.  या शिबिराला ख्रिस्ती समाजासह मोची समाज व इतर विविध समाजातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *