माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचा पुढाकार ; प्रभाग २६ होणार अप टू डेट…

माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचा एकच ध्यास प्रभाग २६ मधील विविध नगरांचा विकास

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१३ नोव्हेंबर 

शहराच्या जुळे सोलापूर भागातील प्रभाग क्रमांक २६ मधील जनतेच्या सर्वांगीण विकासाठी नेहमीच प्रयत्नशील असणाऱ्या माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे प्रभागातील हेरिटेज फॉर्म, ज्योती नगर, बँक कॉलनी, बंडापा नगर, कोरे वस्ती, उद्धव नगर भाग एक व दोन, अमर नगर सोरेगाव, स्वस्तिक नगर, शितल नगर, रजनीश रेसिडेन्सी, आदित्य रेसिडेन्सी, आर्यश रेसिडेन्सी. या विविध नगरात  ड्रेनेज लाईन पूर्णत्वास आली आहे.

    दरम्यान, या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन नसल्याबाबत संबंधित नगरातील नागरिकांनी चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर चव्हाण यांनी तात्काळ पालकमंत्री जयकुमार गोरे आणि सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांना सदर नगरामध्ये पाण्याची पाईपलाईन नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आणून दिले. या विविध नगरात पिण्याच्या जलवाहिनीसाठी निवेदन सादर करावे असे पालकमंत्री जयकुमार गोरे, आयुक्त सचिन ओंबासे यांनी राजश्री चव्हाण यांना सांगितल्यानंतर निवेदन दिल्यानंतर पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

   माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे नागरिकाच्या समस्या सोडवल्या जात आहेत. अशा कर्तव्यदक्ष, अभ्यासू, जनतेच्या हाकेला धावून येणाऱ्या नगरसेविका आहेत. भविष्यात त्यांच्या पाठीमागे आम्ही सदैव पाठीशी राहू असे मनोगत स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *