विधानपरिषदेसाठी भाजपने पंकजा मुंडेंचे केले पुनर्वसन : पाच जणांच्या नावावर शिक्कमोर्तब
सोलापूर दि १ जून – आगामी विधानपरिषदा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी निवडणूक होणार असून यासाठी भाजपने तयारी सुरु केली आहे.महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीने ११ नावे निश्चित करुन ती दिल्लीला पाठवली होती. त्यानंतर आता पाच नावं जाहीर करण्यात आली आहेत.
दरम्यान या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा २ जुलै हा शेवटचा दिवस आहे. याशिवाय विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. अशातच आता भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये पाच जणांची नावं जाहीर करण्यात आली आहे. विधानपरिषदेसाठी भाजपने पंकजा मुंडे, योगेश तिलेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत या पाच जणांची नावं घोषित केली आहेत.