भाजप कार्यालयात एकच जल्लोष घुमला जय श्रीरामचा नारा…! शंखनाद करून केला विजयाचा जयघोष..

भाजप कार्यालयात एकच जल्लोष घुमला जय श्रीरामचा नारा…!

शंखनाद करून केला विजयाचा जयघोष..देवेंद्र कोठे अर्ज भरण्यास रवाना

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२८ ऑक्टोंबर – विधानसभा निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापले आहे. शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी भाजप पक्षाकडून देवेंद्र कोठे यांना उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आज सकाळी भाजप कार्यालयात देवेंद्र कोठे यांनी प्रवेश करताच कार्यालयाच्या पायरीला स्पर्श करून आशीर्वाद घेतला. त्यानंतर सर्वांचे आशीर्वाद घेतले. यावेळी देवेंद्र कोठे यांनी सर्वांचे आशीर्वाद घेऊन भाषणास सुरुवात केली. ते म्हणाले आपण सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे असू द्या, राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला संधी देऊन उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे तुम्ही सर्वांनी देखील माझ्या पाठीमागे खंबीर उभे राहावे. आणि ही मध्याची जागा आपण नक्कीच जिंकू असा आशावाद व्यक्त केला.

        तत्पूर्वी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी देखील कार्यकर्त्यांना सूचना देताना, सर्व ताकदीनिशी ही निवडणूक लढवायची आहे आणि जिंकायची आहे. यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी ठेवा. आपल्यातील नाराजी बाजूला ठेवून जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन केले.

तदनंतर मोजक्या कार्यकर्त्यांसह देवेंद्र कोठे यांनी आपला नामनिर्देशन अर्ज भरण्यास रवाना झाले. यावेळी भाजपचे नेष्ठ नेते पांडुरंग दिड्डी,विजया वड्डेपल्ली, इंदिरा कुडक्याल,रोहिणी तडवळकर,अविनाश महागावकर, माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *