प्रभाग ६ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ देगावमध्ये भीमशक्ती एकवटली : भाजपच्या पाठीशी उभारण्याचा एकमुखी संकल्प
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१० जानेवारी
प्रभाग क्रमांक ६ मधील भारतीय जनता पार्टीचे पॅनल प्रमुख उमेदवार गणेश वानकर,सुनील खटके, मृण्मयी गवळी आणि सोनाली गायकवाड यांचा गेल्या पाच दिवसापासून प्रचाराचा धडाका सुरूच आहे. प्रभागामधील नगरे, वस्त्या तसेच सोसायट्यांमधून सुरू असलेल्या होम टू होम प्रचारामुळे भाजपच्या उमेदवारांना भरघोस पाठिंबा मिळत आहे.शुक्रवारी देगावमध्ये भाजप उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने भीमशक्ती एकवटली होती.देगावमधील भीम नगरात भाजपचे पॅनल प्रमुख व उमेदवार गणेश वानकर, सुनील खटके, मृण्मयी गवळी तसेच सोनाली गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत समाज मंदिरात तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना घेण्यात आली.त्यानंतर झालेल्या बैठकीत भीम नगरातील भीमगर्जना तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विकासासाठी भाजप उमेदवारांच्या पाठीशी राहण्याचा एकमुखी संकल्प केला. जय भीम,जय भवानी जय शिवाजी, जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. गेल्या अनेक वर्षात भीम नगरात विकासाची मोठी कामे केली आहेत. आता सोलापूर महापालिकेत भारतीय जनता पार्टीचे सत्ता येणार आहे. त्यामुळे विकास कामाला आणखी मोठे बळ मिळणार असून विकास हेच आपले व्हिजन असल्याचे पॅनल प्रमुख गणेश वानकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

याप्रसंगी भीम गर्जना तरुण मंडळाचे अध्यक्ष कैलास गायकवाड, बाबा तोरणे, विनोद नाना गायकवाड, गोपी तिकुटे,संभा भोसले, भिमरत्न गायकवाड, सागर डोलारे, रतन गायकवाड, रवी निकंबे,रमेश गायकवाड, रतन पवार, दयानंद गायकवाड, रोहित भवाळ, सुखदेव गायकवाड, अजित साबळे,भीमा गायकवाड, चंद्रकांत निकंबे दूर्वा गायकवाड,सोमा गायकवाड यांच्यासह भीम बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
वानकर कुटुंब सर्व जातीधर्माला सोबत घेऊन जाणारा परिवार
सोलापूरच्या सर्वपक्षीय राजकारणामध्ये वानकर कुटुंबाला मानाचे स्थान आहे.विकासाला वाहून घेऊन तसेच सर्व जातीधर्माला सोबत घेऊन जाणारा, आणि सत्तेच्या माध्यमातून विकास कामे करण्यासाठी बळ देणारा वानकर परिवार असल्याने देगावमधील संपूर्ण भीमशक्ती भाजपच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणार आहे. जास्तीत जास्त भाजपाला मते देऊन भरघोस मतांनी संपूर्ण पॅनलला विजयी करणार असल्याचा विश्वास भीम गर्जना तरुण मंडळाचे अध्यक्ष कैलास गायकवाड यांनी व्यक्त केला .