प्रदेश भाजपकडून विजयकुमार देशमुख यांना मंत्रीपदासाठी प्रथम पसंती ?

प्रदेश भाजपकडून विजयकुमार देशमुख यांना मंत्रीपदासाठी प्रथम पसंती ?

पक्षाशी एकनिष्ठ आणि शहर जिल्ह्यात भाजप वाढवल्यामुळे मंत्रीपदावर लागेल वर्णी

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२५ नोव्हेंबर –

भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान आणि सलग पाचव्यांदा आमदार अशी मजल मारणारे प्रदेश भाजपमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे विजयकुमार देशमुख यांची मंत्री पदी वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

आमदार विजयकुमार देशमुख यांच्या जमेची बाजू

१) सन २०१४ साली सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी असताना महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपची एक हाती सत्ता आणण्याचे किमया साधली..

२) अनेक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना जवळ करीत विधायक पदांवर बसून शहर उत्तर आणि शहराचा विकास साधला.

३) सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदा तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य संजय शिंदे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदी सर्व विरोधी पक्षांना एकत्र करीत भाजपचा झेंडा फडकवला.

४) सोलापूर शहर जिल्ह्याची आर्थिक नाडी असलेली बाजार समिती ची निवडणूक विरोधी गटात जाऊन बाजार समितीच्या सभापती पद मिळवले. सभापतीपदामुळे शेतकऱ्यांच्या फायद्याच्या दृष्टिकोनातून अनेक निर्णय घेण्यात यश आले. बाजार समितीचा विस्तारही केला.

५) स्थानिक स्वराज्य संस्थेची विधानपरिषद निवडणूक जवळचे मित्र असलेले प्रशांत परिचारक यांना विधानपरिषदेवर निवडून आणण्याची खेळी यशस्वी केली.

६) कोणताही राजकीय अनुभव नसताना गुरुस्थानी असलेले डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांना महिन्याभरात भाजपची उमेदवारी मिळवून देऊन त्यांना निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. देवेंद्र फडणवीस यांना दिलेला शब्द खरा करून दाखविला.

७) शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षांच्या शहर जिल्ह्यातील नेत्यांचा विजयकुमार देशमुखांवर विश्वास. तिन्ही पक्षात समन्वय साधण्याचं कसं देशमुख यांच्याकडे आहे.

८) पक्षाला कायम उपयोगाला येणारे अशी ओळख विजयकुमार देशमुख यांची निर्माण झाली. प्रदेश भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली जबाबदारी आजपर्यंत यशस्वीपणे पूर्ण केली. मतदारसंघ आणि शहरात सतत उपलब्ध राहून भाजप वाढवण्याचा प्रयत्न केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *