भाजप बैठकीत निरीक्षक तथा खासदार महाडिक यांना विरोध, महाडिकांच्या भीमा कारखान्याच्या संचालकांनी प्रणिती शिंदे ना पाठिंबा का दिला.? युवकांनी उपस्थित केला प्रश्न
सोलापूर व्हिजन
सोलापूर दिनांक २२ जून :- लोकसभेत झालेल्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी शनिवारी भाजपने बैठक बोलावली आहे. सकाळी ११ वाजता शांतिसागर मंगल कार्यालयात निरीक्षक खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून पराभवामागची कारणे जाणून घेतली. त्यानंतर निरीक्षक खासदार धनंजय महाडिक हे त्याचा अहवाल प्रदेशाला देणार आहेत. दरम्यान जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे भाषण झाल्यानंतर निरीक्षक तथा खासदार धनंजय महाडिक हे बोलण्यास उभे राहिल्यानंतर विकास वाघमारे, सुदर्शन यादव, यतिराज होनमाने, श्रीमंत बंडगर यांच्यासह भाजपमधील युवक आक्रमक झाले त्यांनी निरीक्षक खासदार धनंजय महाडिक यांना विरोध करत एकच गोंधळ घातला.
खासदार धनंजय महाडिक यांच्या भीमा कारखान्याच्या संचालकांनी प्रणिती शिंदे ना पाठिंबा का दिला.? असा प्रश्न युवकांनी उपस्थित केला. माढा, मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा या भागात खासदार धनंजय महाडिक यांचा चांगला प्रस्ता आहे तेथे भाजपाला लीड का मिळाला नाही असाही प्रश्न युवकांनी उपस्थित केला. यावर गोंधळ झाल्यानंतर भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी शांतता राखण्याच्या आव्हान करत बैठकीस सुरुवात केली.