भाजपच्याच बालेकिल्ल्यात भाजपच्याच पदाधिकाऱ्याची जोरदार मोर्चे बांधणी….. सेनेच्या अमोल शिंदे यांची घेतली भेट
मालकांच्या उत्तरला देणार का ?? चोख प्रत्युत्तर सर्वत्र चर्चेला आले उधाण….
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि १२ ऑगस्ट – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षातून चाचपणी सुरू झालेली आहे. काँग्रेसने उमेदवारी अर्ज विक्री करून इच्छुकांचे तपासणी केली आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे अनेक इच्छुक आत्तापासूनच आमदार म्हणून झळकू लागले आहेत. मात्र भाजप पक्षात अनेक पदाधिकारी कार्यकर्ते गुप्त हालचाली करत होते. आता या हालचाली उघडपणे भेटीगाठीत दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी चन्नवीर चिट्टे उघडपणे बॅनर लावून उत्तरसाठी चुरस निर्माण केली आहे.
शहर उत्तर मतदार संघात विजय मालकांचा बोलबाला आहे. यंदाची विधानसभा निवडणूक त्यांना देखील जड जाईल असे संकेत वर्तवले जात आहेत. अशातच आता चिट्टे यांच्या रूपाने उत्तर साठी लिंगायत समाजाचा पर्यायी चेहरा भाजपला मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते देखील भाजपचे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. त्यांच्या प्रामाणिकपणाचा मोबदला उत्तरच्या रूपातून मिळतो का ? असा अंदाज शहर उत्तर मध्ये व्यक्त केला जात आहे.
दरम्यान आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख तथा माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या मोर्चे बांधणीवर यावेळी चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. जर मालकांचे तिकीट कापले गेले तर चिट्टे हे नवा चेहरा म्हणून उदयास येऊ शकतात.
मात्र जर तर च्या गोष्टींवर राजकारण चालत नाही. बराच वेळ या दोन युवा नेत्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचे समजले. भाजपकडून चिट्टे यांना तिकीट मिळाले तर पुढील रणनीती काय असेल याबाबत ही या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची सांगण्यात आले.