नाराज कार्यकर्त्यांना अनेक समित्या, पदांवर संधी देणार
पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री अन् बावनकुळे यांची दिली उदाहरणे

सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.७ डिसेंबर
भाजपमधील जुने कार्यकर्ते नाराज असले तरी त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुढाकार घेतला. कार्यालयातून फोन करुन जुन्या कार्यकर्त्यांना बोलावले. पक्षासाठी काम करा, पक्ष आपला विचार करेल, असे सांगत पुढील काळात भाजपमधील व विविध पदांवर जुन्या कार्यकर्त्यांना घेण्याचा शब्द दिला. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घ्या, असे मत जुन्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. मत ऐकून घेतल्यानंतर पालकमंत्री गोरे यांनी उपस्थितांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उदाहरणे दिली.

नाराज न होता काम करा… योग्य दखल घेऊ
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जुन्या कार्यकत्यांना धीर दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उदाहरण दिले. मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर आले. त्यानंतर पक्षाने पुन्हा मुख्यमंत्री केले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारली. तरीही त्यांनी पक्षासाठी काम केले. ते आज राज्यातील दोन नंबरच्या पदावरचे मंत्री आहेत. त्याप्रमाणे आपणास येणाऱ्या काळात पदे दिली जातील. कार्यकर्त्यांनी नाराज न होता काम करावे. आपली योग्य दखल घेतली जाईल, असेही ते म्हणाले.