धर्मांध शक्ती भारताला तोडू शकत नाहीत :- माधवी लता.

धर्मांध शक्ती भारताला तोडू शकत नाहीत :- माधवी लता

बटेंगे तो कटेंगे याचा मतितार्थ उलगडला तेलंगणातल्या फायर ब्रँड नेत्या माधवी लता यांनी…! 

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१२ नोव्हेंबर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारकांची जोरदार भाषणे सुरु झाली आहेत. त्याच पद्धतीने पदयात्रेतून नागरिकांच्या घरोघरी जाऊन संबोधन करू लागले आहेत. तेलंगणाच्या भाजपच्या स्टार माधवी लता सोलापुरात तळ ठोकून आहेत. गेल्या दोन दिवसापासून त्यांनी शहर उत्तर मध्य आणि दक्षिण या तीनही विधानसभा मतदारसंघासाठी प्रचार सभा रॅली यांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. माधवी लता यांनी सोलापूर शहर उत्तर मध्ये पदयात्रा करत तेलगू भाषिकांना आवाहन केले आहे.

  

 माधवी लता म्हणाल्या की, तेलगू परिवारासहित देशातील सर्व जाती-धर्मातील लोकांनी एकसंध राहून देशाला प्रगतीपथावर घेऊन जायचं आहे. कोणतीही धर्मांधशक्ती भारताला तोडू शकत नाहीत. सारे भारतीय नागरिक एक असून तर आपल्यात दुफळी निर्माण होणार नाही. जर आपल्यात धर्मांध शक्तींनी डोकं वर काढले तर आपल्यात विभाजन होईल आणि अस्थिरता येईल. देशाचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं आहे. बटेंगे तो कटेंगे असे तेलंगणा येथील भाजपच्या नेत्या माधवी लता यांनी शहर उत्तर च्या प्रचारा दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान महाराष्ट्र ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्य आजही प्रेरणा देणार आहे. देशातील हिंदू, मुस्लिम, सिख ईसाई आणि बौद्ध धर्मातील लोकांनी देशाला एकसंध ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे येणाऱ्या पिढीचे भविष्य उज्वल असेल.भारत हा शक्तिशाली बनत चालला आहे. देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळे संपूर्ण विश्वात भारतीयांना वेगळी ओळख निर्माण झाली आहे. याचा अभिमान तुम्हा आम्हा सगळ्यांना असला पाहिजे. देशाच्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत वासियांनी भारतीय जनता पक्षाच्या मागे आपली शक्ती उभी केली पाहिजे. तरच आपण प्रगतीपथावर पोहोचू असे माधवी लता यांनी सांगितले. सोलापूर शहरात तेलुगु भाषिक परिवारांची संख्या अधिक आहे. तेलुगु शक्ती भाजपचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या मागे सातत्याने उभी आहे. सोलापुरात आल्यापासून माझ्या प्रत्येक कार्यक्रमात तेलगू भाषेत संवाद साधल्यामुळे मला सोलापूर शहर हे अत्यंत जवळचे वाटले आहे. सोलापूरकरांनी मला जे प्रेम दिले ते न विसरण्यासारखे आहे. राज्यात महायुतीची सत्ता आल्यास पुन्हा एकदा शहर उत्तर मधील नागरिकांशी स्वतंत्रपणे संवाद साधेन असे म्हणत येथील नागरिकांची प्रतिसाद पाहून भारावले असल्याचे माधवी लता यांनी सांगितले.

सोलापूर शहर उत्तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ भवानी पेठ, घोंगडे वस्ती, इंदिरा वसाहत, जोडभावी पेठ आदी भागात अनेक बाजारपेठा आणि  प्रतिष्ठित मंडळींच्या घरोघरी जाऊन संवाद साधला. भवानी पेठेतील उद्योजक वेंकटेश चाटला यांच्या शोरूम मध्ये सर्व कामगारांशी संवाद साधत भाजपच्या हात बळकट करावे असे आवाहन केले. यावेळी त्यांच्या समवेत डॉक्टर उर्वशी देशमुख, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, राजकुमार पाटील, गोपीकृष्ण वड्डेपल्ली, राहुल शाबादे, सुमित बिराजदार आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *