माझ्यावर विषप्रयोग केलेल्या भाजपच्या लोकांना तुम्ही निवडून देणार का ? सवाल केला उपस्थित
सुरेश पाटील यांनी भाजपला दिला घरचा आहेर !
महेश कोठे यांना जाहीर पाठींबा देत निवडून देण्याचे आवाहन केले…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.११ नोव्हेंबर – विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत तशी रंगत वाढत असून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. भवानी पेठ परिसर हा भाजपचा बाले किल्ला मानला जातो. या भागात नगरसेवक देखील भाजपचे निवडून येतात. मात्र यंदाचे वातावरण बदलत चालले आहे. महेश कोठे यांच्या उमेदवारीमुळे आता मतदारांना सक्षम पर्याय मिळालेला आहे. दरम्यान याच अनुषंगाने दाळगे प्लॉट येथे महाविकास आघाडीचे उमेदवार महेश कोठे यांची कॉर्नर बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी होती. यावेळी भाजपचे माजी नगरसेवक सुरेश पाटील यांची विशेष उपस्थित होते. यावेळी सुरेश पाटील भाजप नेत्यावर आपली तोफ डागली, ज्या भाजप मधील लोकांनी मला त्रास दिला, माझ्यावर विष प्रयोग केला अशा लोकांना निवडून देऊ नका, म्हणत शहरातील स्थानिक भाजप नेत्यांवर हल्लाबोल करत घरचा आहेर दिला आहे. त्याच बरोबर महेश कोठे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन देखील केले आहे. सुरेश पाटील यांनी भाजपला घरचा आहेर दिल्याने, सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिकांची उपस्थिती होती.