भाजपने शरद पवारांच्या नावाचे पाडले पोस्टर….!
प्रभू श्रीरामचंद्र आणि श्री स्वामी समर्थ यांच्यावर आक्षेपार्ह व्यक्तव्य करणाऱ्या व्यक्तींना पाठीशी घातल्याचा व्यक्त केला निषेध…..
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर दि. १३ सप्टेंबर – हिंदू धर्माचे आराध्य दैवत असणारे प्रभू श्रीरामचंद्र आणि ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींना भर सभेत शरद पवार यांनी पाठीशी घातल्याने भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर कार्यालयाच्या वतीने दाजी पेठ येथे निषेध आंदोलन करण्यात आले. प्रभू श्री रामचंद्र आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊ नये शरद पवार यांच्या नावाचे पोस्टर फाडून तुडवण्यात आले.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून हिंदू धर्मातील विविध देवतांवर बेछूटपणे प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या जात आहेत. अशीच घटना काही दिवसापूर्वी घडली होती. त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी पार्टी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्येच काही व्यक्तींनी प्रभू श्री रामचंद्र आणि श्री स्वामी समर्थ यांच्या बद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यावेळी शरद पवार यांनी संबंधित व्यक्तींना पाठीशी घातले. त्यामुळे शरद पवार यांच्यावर सर्व स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर कार्यालयाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन प्रभू श्री रामचंद्र आणि श्री स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन केले तर नंतर आरती केली.
भजन गाऊन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. तदनंतर विविध घोषणा देत शरद पवार यांच्या नावाचे पोस्टर फाडण्यात आले. यावेळी विविध पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना घडलेल्या घटनेवर तीव्र आक्षेप नोंदवून नाराजी व्यक्त केली.
शरद पवार यांनी आक्षेपार्ह वक्तव्यचे समर्थन केल्याने त्यांच्या विरोधात आंदोलन…
शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संभाजी ब्रिगेड संघटनेचे व्यासपीठावर हे वक्तव्य झाले , तेव्हा शरद पवार यांनी याबाबत संबंधित व्यक्तीची कान उघडणी करणे गरजेचे होते, परंतु पवार यांनी एक आवअक्षर सुद्धा काढला नाही. त्यामुळे शरद पवार यांनी या आक्षेपार्ह वक्तव्यचे समर्थन केल्याचे सिद्ध या कारणामुळेच शरद पवार यांचा आम्ही निषेध व्यक्त करत आहे.
– नरेंद्र काळे , शहराध्यक्ष भाजप सोलापूर.
या आंदोलनावेळी माजी महापौर श्रीकांना यन्नम, भारतीय जनता पार्टी महिला युवा मोर्चा महिला प्रदेश सचिव वृषाली चालुक्य माजी नगरसेवक देवेंद्र कोठे , माजी नगरसेविका रामेश्वरी बिरू , आनंद बिरू, दत्तात्रेय पोसा , नागेश सरगम , जय साळुंखे , बंटी क्षीरसागर , आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.