आम्ही बोलून नाही तर करून दाखवलं असं म्हणत भाजपने विमानसेवा सुरू केली : अनंत जाधव…सोलापूर गोवा विमानाचे तिकिट काढून केले उपहासात्मक आंदोलन

भाजपा नेते अनंत जाधव यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि शहराध्यक्ष चेतन नरोटे यांचे सोलापूर गोवा विमानाचे तिकिट काढून केले उपहासात्मक आंदोलन

आम्ही बोलून नाही तर करून दाखवलं असं म्हणत भाजपने विमानसेवा सुरू केली : अनंत जाधव…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२८ मे

सोलापुरातली विमानसेवा गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे ती सुरू व्हावी यासाठी भाजप पक्षातील अनेक नेते प्रयत्न करत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे परंतु दुसरीकडे काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आणि शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी अनेक वेळा भाजप हे खोटे बोलतो आणि रेटून बोलते असे म्हणत विमानसेवा भाजपकडून सुरू होणार नाही असे मत अनेक वेळा व्यक्त केले होते. यासाठी काँग्रेसच्या वतीने आंदोलन देखिल केले होते.

परंतु भाजप बोलत नाही तर प्रत्यक्षात करूनही दाखवतो असे म्हणत भाजपचे नेते अनंत जाधव यांनी विमान सेवा सुरू झाल्याच्या निमित्ताने काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांचे सोलापूर गोवा विमान प्रवासाच्या पहिल्या दिवशीचे तिकीट काढून उपासनात्मक आंदोलन केले. प्रणिती शिंदे आणि चेतन नरोटे यांच्या नावाने ऑनलाइन माध्यमातून दोन्ही तिकीट काढले आहेत. ते त्यांना पाठवून देणार असल्याची माहिती देखील भाजप नेते अनंत जाधव यांनी दिली.

काँग्रेस हे नेहमी फक्त स्टंटबाजी आणि पब्लिसिटी साठी आंदोलन करते सोलापूरच्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे काही देणे घेणे नाही. काँग्रेसकडे मुख्यमंत्री, केंद्रीय ऊर्जामंत्री, केंद्रीय गृहमंत्री, आमदार, खासदार अशी अनेक पदे होती. परंतु त्यांनी सोलापूरसाठी काही केले नाही. भाजपाने जे जे आश्वासन सोलापूरसाठी दिली ती सगळी पूर्ण केली, यातील दुहेरी पाईपलाईन, विमान सेवा, दोन्ही उड्डाणपूल असतील यासह शहरातील सर्वांगीण विकासासाठी अनेक कामे मार्गी लावली आहेत. असे म्हणत आम्ही फक्त बोलत नाही तर प्रत्यक्षात करून दाखवतो असेही भाजप नेते अनंत जाधव म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *