हेच का ते एकनिष्ठ ; सोशल मीडियावर इलेक्शन वॉर  ; एकमेकांचे कार्यकर्ते लागले कामाला

हेच का ते एकनिष्ठ ; सोशल मीडियावर इलेक्शन वॉर 

मात्र ये पब्लिक है सब जानती है ; अद्याप भाजपचे उमेदवार जाहीर नाही 

सोलापूर व्हिजन न्यूज,

सोलापूर दि.२८ डिसेंबर 

सोलापूर भारतीय जनता पार्टीमध्ये महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुकांचे भाऊ गर्दीवरून सध्या घमसान सुरू आहे. आमदार विजयकुमार देशमुख यांनी घाऊक इनकमिंग विरोधात महाराज व्यक्त करताना माझ्या निष्ठावंत एकनिष्ठ कार्यकर्त्याला न्याय न मिळाल्यास मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहीन त्याचा प्रचार करेन, अशी घोषणा केल्यानंतर आता सोशल मीडियावर ” हेच का ते एकनिष्ठ निष्ठावंत” सोशल वॉर सुरू झालेले दिसत आहे. विजय मालकांनी आयात केलेल्या विविध नगरसेवकांची यादी व्हाट्सअप ग्रुप वर फेसबुक वर फिरत आहे. हे नगरसेवक कोणत्या ना कोणत्या पक्षातून आयात केलेले आहेत असे, उल्लेख त्यावर दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर भाजपच्या अंतर्गत वादाची आणि घामासानाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान, २०१७ रोजी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत देखील विजय मालकांनी आपल्या शहर उत्तर मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी शिवसेना रिपाई अशा विविध पक्षातून उमेदवार आयात केलेले होते त्याच उमेदवारांना उमेदवारी देऊन जिंकून आणले. परंतु त्यावेळी देखील निष्ठावंत कार्यकर्ते भाजपचे होते तेव्हा निष्ठावंतांची आठवण आली नाही का आताच आठवण येते का असा प्रश्न देखील यामधून उपस्थित केला जात आहे.

नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस आणखीन दोन दिवसांचा कालावधी बाकी असताना शहर परिसर राजकीय वरात वातावरणात ढवळून निघत आहे. सत्ताधारी भाजप महायुतीला विरोधकाची गरज नाही तिन्ही पक्ष एकमेकांचे विरोधक असल्याची चर्चा आता शहरात आता रंगू लागलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसात भाजपकडून नेमक्या कोणत्या उमेदवारांना उमेदवारी दिली जाते आणि कोणता उमेदवार बंडखोरी करतो हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.

अद्याप भाजपचे उमेदवार जाहीर नाही 

महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपची पहिली २५ ते ३० जणांची यादी जाहीर होईल, असे वाटत होते. अनेक ठिकाणच्या नावांवर एकमत न होणे, बंडखोरी होण्याची शक्यता यामुळे भाजपने यादी जाहीर करण्याचे टाळले आहे. त्यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. भाजपची यादी नाही; कोणाला निरोपही नाही, त्यामुळे करायचे काय असा प्रश्न भाजप इच्छुकांपुढे आहे.

सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे उमेदवारांचे लक्ष हे पक्ष नेतृत्वाकडे लागले आहे. ते कधी उमेदवारांची यादी जाहीर करतात याची वाट पाहत आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया किचकट आहे, त्यात महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र सोबत जोडावे लागतेच, पण आर्थिक विषयक विवरणही तयार करावे लागते. त्यामुळे उमेदवारांनी आपल्याच तिकीट मिळेल या भरवशावर वकिलांच्या मदतीने अर्ज तयार ठेवले आहेत.

 

भाजपकडून ज्या जागी काही अडचण नाही, अशा २५ ते ३० जणांची यादी जाहीर होईल असे सांगितले होते. पण यादी जाहीर करण्याचे टाळण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळीच भाजपाची यादी एकदम जाहीर होणार आहे. शहरात अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष आता एकत्रित लढणार आहेत. भाजपमध्ये बंडखोरी झाल्यास हे तिन्ही पक्ष नाराज उमेदवारांना धरणार यात शंका नाही. भाजपने पहिली यादी जाहीर केल्यानंतर ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, असे नाराज इच्छुक विरोधी पक्षात जाऊन बंडखोरी करू शकतात. पक्षातील नाराजांकडून उमेदवारी बदलासाठी पक्षाच्या नेत्यांवर दबाव आणला जाऊ शकतो. याकारणांनी भाजपने लगेच उमेदवारी यादी जाहीर करणे टाळले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *