निवडणूक कार्यालयात प्रवेश करणाऱ्या भाजपा शहराध्यक्ष तडवळकर गेटवर अडवले ; ढकला ढकलीसह प्रचंड गोंधळाची स्थिती 

चिप्पा यांच्या अर्जात ज चा न झाल्याने विरोधकांनी घेतली हरकत..

गोंधळ परिस्थिती पोलिसांनी हाताळली

निवडणूक कार्यालयात प्रवेश करणाऱ्या भाजपा शहराध्यक्ष तडवळकर गेटवर अडवले ; ढकला ढकलीसह प्रचंड गोंधळाची स्थिती 

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.३१ डिसेंबर 

प्रभाग क्रमांक १३ चे भारतीय जनता पार्टीचे  उमेदवार विजय भुमय्या चिप्पा यांच्या बी फॉर्मवर ज ऐवजी न दिसल्याने विरोधकांनी हरकत घेतली. त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी नॉर्थकोट निवडणूक कार्यालयात येणाऱ्या भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना नॉर्थकोटच्या मुख्य प्रवेशद्वारावर विरोधी कार्यकर्त्यांनी आडविले. यावेळी प्रचंड गदारोळ, ढकलाढकली आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्याही परिस्थितीत धावत पळत जाऊन अखेर कार्यालयात गेले. रोहिणी तडवळकर यांनी निवडणूक कार्यालयात प्रवेश केला. अखेर चिप्पा यांचा अर्ज वैध झाल्याचे सांगण्यात आले.

भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना धावत पळत कार्यालयात नेण्यात आले…

   सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार विजय चिप्पा यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक चार येथे प्रभाग १३ मध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सायंकाळी त्याची आज छाननी होती. यावेळी विरोधकांनी विजय ऐवजी विनय असे उमेदवारी अर्जावर नमूद आहे. त्या असे सांगत अर्जावर हरकत घेतली. ज्यांनी एबी फॉर्म दिला आहे. त्यांचीच बाजू ऐकून घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना पाचारण केले. मात्र ते लांब असल्याने त्यांना या कार्यालयात येण्यास विलंब झाला. बाजू ऐकून घेण्यासाठी दिलेली वेळ संपली आहे. चिप्पा यांचा अर्ज बाद करावा. अशी मागणी विरोधकांनी केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी आणखीन दहा मिनिटांचा वेळ दिला. तरीही त्यांना कार्यालयात येण्यास वेळ झाला. अखेर काही वेळातच रोहिणी तडवळकर या नार्थकोटच्या मुख्य प्रवेशद्वारात दाखल झाल्या. मात्र येथे विरोधी कार्यकर्त्यांनी त्यांना अडवले. या ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. आणि ढकलाढकली व गदारोळ झाला. तशाही परिस्थितीत शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर या निवडणूक कार्यालयात पोहोचल्या. अँड संतोष नाव्हकर यांनी आपली बाजू मांडली आणि एफिडेविट सादर केले. अखेर चिप्पा यांचा अर्ज वैध झाल्याचे सांगण्यात आले.

मुख्य प्रवेशद्वारात अडवल्यामुळे यायला थोडासा उशीर झाला : तडवळकर 

भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय चिप्पा यांच्या बी फार्मवर हस्ताक्षरामध्ये थोडा बदल झाला होता. यामुळे विजय ऐवजी विनय दिसू लागले होते. ज थोडासा वर आला होता. त्यावर विरोधकांनी हरकत घेतले होती. तो विनय नसून विजयच आहे. हे सांगण्यासाठी मी इथे आले होते. यासंबंधी अफेडेविट सादर केले. मला मुख्य प्रवेशद्वारात अडवल्यामुळे यायला थोडासा उशीर झाला. शहरातल्या कार्यकर्त्यांनी पॅनिक होण्याची गरज नाही. कार्यकर्त्यांनी संयम राखावा. गोंधळ करू नये. सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी दिली.

धावता धावता रोहिणी तडवळकर यांना लागला दम …
 उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी आणले हाताला धरून..

विरोधकांनी ध चा मा केला : ॲड. संतोष नाव्हकर 

भाजप उमेदवार विजय चिप्पा यांच्या बी फार्मवर नाव लिहिताना ज वर आला. त्यामुळे तो न दिसू लागला. एकंदरीत विरोधकांनी त्याचा ध चा मा केला. त्यावर हरकत घेतली होती. त्यानंतर न्यायालयात सुद्धा विनंती केली. जी काही चूक झाली आहे. ती दुरुस्त करण्यासाठी वेळ द्या. त्यासाठी संधी मिळायला हवी. न्यायालयाने विनंती मान्य केल्यानंतर पंधरा मिनिटांचा वेळ दिला. प्राधिकृत व्यक्ती  स्वतः सांगत नाही. तोपर्यंत ते अर्ज वैध ठरत नव्हते. कोर्ट निर्णयापर्यंत येऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांना पाचरण करण्यात आले. त्यांना यायला उशीर झाला. त्यामुळे पुन्हा एकदा निर्णय घेण्यासाठी विरोधकांनी आग्रह केला. नैसर्गिक न्याय तत्वावर आम्हाला बाजू मांडण्याची संधी द्या. अशी मागणी केल्यानंतर न्यायालयाने वेळ वाढवून दिला. मात्र त्यांना अडवलं गेलं. मागणी करत राहिले वेळ संपली आहे,  निर्णय द्या.असे सांगितले. एखादी व्यक्ती कोर्टासमोर आली नाही म्हणून त्यांच्या विरोधात निर्णय देणे असे नियमात नाही. हा मुद्दा ग्राह्य धरण्यात आला आणि उमेदवाराचा अर्ज वैध ठरवण्यात आला. अशी माहिती भाजपचे वकील ॲड. संतोष नाव्हकर यांनी दिली.

सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली दिलेला हा निर्णय : ॲड.

अनिल वासम

भाजपचे उमेदवार विजय चिप्पा यांच्या बी फार्मवर विनय चिप्पा असे लिहिलेलं होतं. मात्र मतदार यादी मध्ये त्यांचे नाव विजय असे होते. जोडपत्र बदलता येत नाही. जोडपत्रावर विनय चीप्पा असे होते. त्यावर आम्ही आक्षेप नोंदवला. त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विजय आणि विनय दोन्ही एकच व्यक्ती आहेत. हे ज्यांनी प्राधिकृत केले आहे. त्यांना पाचरण करण्यास सांगितले. त्यांचे प्राधिकृत व्यक्ती उशीर आले. त्यांना दिलेली वेळ संपली आहे. यांचा अर्ज अवैध करा. चिन्ह काढून घ्या त्यांना अपक्ष करा. अशी आम्ही मागणी केली. मात्र सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली हा निर्णय दिला गेला आहे. असा आरोप करत  उच्च न्यायालयात धाव घेणार आहे. अशी माहिती विरोधी उमेदवाराचे वकील ॲड.अनिल वासम यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *