लाडकी बहिणींच्या मतदानरूपी आशिर्वादने महायुतीचा ऐतिहासिक विजय संतोष पवार
या निवडणुकीत लाडक्या बहिणींनी विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली :- अमोल शिंदे
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२४ नोव्हेंबर –
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत महायुतीला भरघोस मतांनी विजयी करत पुन्हा एकदा सत्तेवर आरूढ केले आहे. यंदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना प्रभावी ठरली आणि राज्यातील महायुती उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे लाडक्या बहिणी उभे राहत विरोधकांचा सुपडा साफ केला. याच पार्श्वभूमीवर महायुतीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
सोलापूर शहरात भाजप आणि महायुती मधील घटक पक्ष राष्ट्रवादी, शिवसेना यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करत एकच जल्लोष साजरा केला. यावेळी गुलालाची मुक्त उधळण करत, हलग्यांचा कडकडाटात आणि फटाक्यांची आतिषबाजी करून विजयी मिरवणूक काढली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, महायुती सरकारचा विजय असो अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. महायुतीतील प्रमुख पदाधिकारी यांनी एकमेकांना मिठाई भरवून विजयाचा आनंद साजरा केला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, यांच्यासह जेष्ठ नेते, प्रांतिक सेलचे सर्वच प्रमुख पदाधिकारी नेते , फ्रंटल सेलचे अध्यक्ष ,कार्याध्यक्ष , पदाधिकारी महिला आघाडी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी माहितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, महायुती सरकारने केलेल्या राज्याच्या सर्वागीण विकासाच्या जोरावर मतदारांनी विरोधकांच्या भुलथापांना बळी न पडता मत पेटीतून चोख प्रत्युत्तर देत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचंड मताधिक्याने विजय केला . या विजयात लाडक्या बहिणींचा सिंहाचा वाटा आहे.हा विजय केवळ महायुतीचा नसून तो मतदारांचा आहे .यापुढे देखील महायुतीचे हे आपल्या हक्काचे सरकार विविध योजनांच्या माध्यमातून राज्याचा सर्वांगीण विकास करण्यावर यापेक्षाही अधिक भर देईल, असे सांगताना विजय उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
तदनंतर चार हुतात्मा चौक , पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर,विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.