भाजपा महाराष्ट्र आदिवासी कार्यकर्ता संमेलन परिषद उत्साहात संपन्न…!
आदिवासी समाजाच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचा केला दावा..
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर , दि. २३ सप्टेंबर – भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र आदिवासी कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन नाशिक येथे करण्यात आले होते. यावेळी मेळाव्यात आदिवासी समाजाच्या हिताचे निर्णय घेण्यात सरकार यशस्वी वाटचाल करत असून याच माध्यमातून विविध बाबींवर साधक बाधक चर्चा करण्यात आली.
दरम्यान गतलोकसभेत एस.सी. एस.टी. व मागासवर्गीय आदिवासी यांना संविधान बदलणार म्हणून महाविकास आघाडीचे प्रमुख नेते यांनी चुकीचा अपप्रचार करून सर्वसामान्य जनतेला एक प्रकारे फसवणूकच केलेली आहे. येणाऱ्या विधानसभेतही असाच अपप्रचार करून व तसेच मराठा, ओबीसी,समाजाचा रोष युती सरकारवर करण्याच्या प्रयत्नात असून दोन समाजात तेढ निर्माण करून अशांतता निर्माण करण्याच्या प्रयत्नात असून त्यांच्या कुठल्याही भुलतापांना सर्वसामान्यजनता, दलित , ओबीसी आदिवासी मागासवर्गीय यांनी बळी पडू नये.
सदरचे युती सरकार हे जनतेच्या मनातील कामे करीत असून सर्वात लोकप्रिय झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झाल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत म्हणून विरोधकांच्या कुठल्याही आमिषाला बळी पडू नये हे सरकार फक्त सर्वसामान्य जनतेचे हिताचे कामे करीत आहेत असे अनेक विकासाचे मुद्दे या मेळाव्यात उपस्थित केले.
या मेळाव्यात महाराष्ट्रातील सर्व प्रमुख कार्यकर्त्याना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय मंत्री तथा प्रदेश प्रभारी भुपेद्र यादव , केंद्रीय संघटन मंत्री शिवप्रकाश, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित , हिना गावित, अनुसूचित जनजागृती राष्ट्रीय सरचिटणीस खासदार गजेंद्र सिंह पटेल, आमदार गणपत वसवा, गुजरात विधानसभेचे माजी सभापती डॉक्टर निशांत खरे, संपर्कप्रमुख राहुल कुलकर्णी, गणेश ठाकूर, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश अध्यक्ष उत्तमराव इंगळे , महामंत्री सुदर्शन शिंदे, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण, भाजपाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थित होते .