नोकरी मेळाव्यातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा – पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांचे प्रतिपादन शिखर पहारीया फाउंडेशन व भारती विद्यापीठ यांचा स्तुत्य उपक्रम ;

नोकरी मेळाव्यातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा – पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांचे प्रतिपादन

शिखर पहारीया फाउंडेशन व भारती विद्यापीठ  यांचा स्तुत्य उपक्रम

शहर व परिसरातील पाच हजारहून अधिक उमेदवारांचा सहभाग…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि. ३ जून

रोजगाराची संधी उपलब्ध करणे हे आज काळाची गरज आहे.शिखर पहारीया फाउंडेशन ,भारती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने जॉब फेअर हा चांगला उपक्रम राबविला.जॉब फेअर माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी केले.

         शिखर पहारीया फाउंडेशन आणि भारती विद्यापीठ अंतर्गत अभिजीत कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्स, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने व क्यू. जे. पी .आर. ग्रुप यांच्या सहकार्याने भारतीय विद्यापीठ सोलापूर येथे जॉब फेअर चे आयोजन करण्यात आले होते. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या जॉब फेअरचे उद्घाटन सोलापूर पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आले.  त्या प्रसंगी ते बोलत होते.

   

   यावेळी कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त संगीता खंदारे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, झवेरी एंटरप्राईजेस  संदीप झवेरी, क्यू.जे. पी .आर. ग्रुप तर्फे मारुती गायकवाड व इतर मान्यवरांचे प्रमुख उपस्थिती होती.

    

        स्वागतपर भाषणामध्ये संचालक प्रा. डॉ. एस. बी. सावंत यांनी भारतीय विद्यापीठ नेहमीच युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. शिखर पहारीया फाउंडेशनचे समन्वयक राज सलगर यांनी शिखर फाउंडेशन तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.प्रमुख पाहुण्यांचा सत्कार इन्स्टिट्यूट चे संचालक प्रा. डॉ. एस. बी. सावंत व शिखर पहारीया फाउंडेशनचे समन्वयक तन्वीर शेख यांच्या हस्ते करण्यात आला.           

      सूत्रसंचालन डॉ. साक्षी बरबडे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख प्लेसमेंट समन्वयक डॉ. शबनम माने यांनी करून दिली तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. पी. पी. कोठारी यांनी केले . हा जॉब फेअर यशस्वी करण्यासाठी भारती विद्यापीठातर्फे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिखर पहारीया फाउंडेशन फाउंडेशन तर्फे समन्वयकांनी  परिश्रम घेतले.

नोकरी मेळाव्यामध्ये सोलापूर, पुणे, मुंबई, बेंगलोर, गोवा, हैदराबाद अशा विविध ठिकाणाहून ८० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये आय.टी. ऑटोमोबाईल ,कन्स्ट्रक्शन, प्रोडक्शन, एज्युकेशन, फायनान्स, हॉस्पिटल, सेल्स व मार्केटिंग या क्षेत्रातील कंपन्यांचा सहभाग होता. ९  हजारहून अधिक नोकरीच्या संधी होत्या. सोलापूर शहर व परिसरातील पाच हजारहून अधिक उमेदवारांनी या जॉब फेअर मध्ये सहभाग नोंदवला. दहावीपासून पदव्युत्तर पर्यंतच्या सर्व उमेदवारांसाठी हा जॉब हेअर फेअर संपूर्णपणे मोफत आयोजित करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *