धोकादायक बनलेल्या भैया चौकातील रेल्वे ब्रिजवरून विरुद्ध दिशेने वाहनधारकांची वाटचाल…….




लोखंडी गज लावून देखील जड वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांना आणि प्रशासनाच्या सूचनेला फासला हरताळ……
सोलापूर व्हिजन
सोलापूर दिनांक :- सोलापूर शहरातील भैय्या चौक ते मरीआई चौक दरम्यान असणारा रेल्वेचा शंभर वर्षांपूर्वीचा ब्रिज सध्या जीर्ण स्वरूपात आलेला आहे . या रेल्वे ब्रिजची कालमर्यादा संपल्याने सदरचा ब्रिज प्रशासनाने जड वाहतुकीसाठी सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद ठेवला आहे मात्र वाहनधारक ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. लोखंडी गज लावून देखील वाहनधारक खुलेआम बिनधास्त विरुद्ध दिशेने पुलावरून जाण्यास धजावत नाही. बुधवारी सकाळी हे चित्र दिसून आले. लोखंडी गज असून छोटा हत्ती वाहन पुढे जात नाही हे बघितल्यानंतर देखील वाहनधारक बिनधास्तपणे विरुद्ध दिशेने गाडी चालवून अपघाताला आमंत्रण देत आहेत. वास्तविक पाहता प्रशासनाने सदरचा रस्ता जड वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंद ठेवला आहे असे फलक निदर्शनास येतील अशा स्थळी लावले आहेत तरी देखील वाहनधारक नियम मोडण्यात मशगुल झाले आहेत. रात्री अपरात्री लोखंडी गज तोडून वाहने बसवली जात आहेत तर दिवसाढवळ्या डोळ्यांना दिसते तरीही विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये प्रशासनाने दिलेल्या सूचनेचा आणि वाहतुकीच्या नियमांना हरताळ फासला जात आहे. सदरचे नियम आणि सूचना पायदळी तुडवून वाहनधारक अशा पद्धतीने जर बेकायदेशीर वाहतूक करून एखाद्याच्या जीविताला धोका निर्माण करीत आहेत. सदरचा छोटा हत्ती वाहनधारकाने लावलेले लोखंडी गज पाहून तसेच ब्रेक लावून थांबून पुन्हा गाडी रिवस घेत बिनधास्तपणे विरुद्ध दिशेने गाडी चालवत पुढे जात आहेत. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देणे आवश्यक बनले आहे अन्यथा वाहनधारकांच्या उलट्या दिशेने जाण्यासाठी रांगा लागतील अशी नाराजी स्थानिकांमधून व्यक्त केली जात आहे…
वाहतूक शाखेच्या पोलीसांचा दिसून आला अभाव…..
भैय्या चौकात दररोज वाहतूक शाखेचे पोलीस कर्तव्य बजावत असतात परंतु सध्याच्या घडीला या चौकात एकही वाहतूक शाखेचा पोलीस कर्मचारी निदर्शनास आला नाही. जर या ठिकाणी वाहतूक शाखेचे पोलीस तैनात केले असते तर सदरच्या वाहनधारककाचे धाडस ब्रिज वरून विरुद्ध दिशेने जाण्यासाठी झाले नसते…. अशी खंत यावेळी स्थानिकांनी व्यक्त केली. दरम्यान या ठिकाणी उपस्थित असलेल्या रिक्षा स्टॉपवरील रिक्षाचालकांनी सदरच्या वाहनधारकाला ब्रिज वरून न जाण्यासाठी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने कोणाचेही न ऐकता सरळ गाडी पळवली……