भैय्या चौकातील त्या लोखंडी बारला जड वाहनाची रात्री धडक : धोकादायक रेल्वे ब्रिजवरुन जाणाऱ्या जड वाहतुक सुरू : अपघताचा धोका बळावला :

 धोकादायक रेल्वे ब्रिजवरुन जाणाऱ्या जड वाहतुक सुरू : अज्ञात वाहनाच्या धडकेने अपघताचा धोका बळावला :

भैय्या चौकातील त्या लोखंडी बारला अज्ञात जड वाहनाची मध्यरात्री धडक : जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज 

सोलापूर व्हिजन

सोलापूर दिनांक :- भैय्या चौकातील धोकादायक रेल्वे ब्रिजवरुन जाणाऱ्या जड वाहतुकीला ब्रेक लावण्यासाठी मरिआई चौकात लावण्यात आलेल्या लोखंडी बार बुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने लोखंडी बार पोलसह रस्त्यावर उखडून पडला आहे. सदरचे वाहन धडक देऊन निघून गेल्यांनतर त्याची दर्शनी भागावर असलेली मोठी काच मात्र रस्त्यावर पडलेली दिसून आली आहे. सदर अपघातानंतर लोखंडी बार पूर्णपणे उखडून बाजूला झाला आहे. त्यामुळे हा धोकादायक रस्ता पूर्वीसारखा वापरला जात आहे धोकादायक बनलेल्या शंभरवर्षांपूर्वीचा रस्ता पुन्हा जड वाहतूक सुरु झालेली आहे. सदरची वाहतूक सुरू झाल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे. रात्रीच्या अंधारामध्ये संबंधित वाहनधारकाने हे कृत्य केले आहे. त्याच्या एका चुकीमुळे या ब्रिजवरून बंद करण्यात आलेली वाहतूक पुन्हा एकदा काही काळासाठी सुरू झालेली आहे.

दरम्यान इंग्रजांच्या काळात निर्माण केलेला ह्या रेल्वे ब्रिजला शंभर वर्ष पूर्ण झाले असून जड वाहतुकीसाठी सदरचा रेल्वे ब्रिज धोकादायक स्थितीत आला आहे त्यामुळे प्रशासनाने सदरचा ब्रिज मोठ्या वाहनांसाठी आणि जड वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे तसा रीतसर फलक देखील या ठिकाणी लावण्यात आला आहे तरीदेखील रात्रीच्या अंधारामध्ये वाहनधारकांनी सूचनेचे पालन न करता सरळ वाहन त्या लोखंडी बार नेऊन धडक मारली आहे त्यामुळे रस्त्यावरील जड वाहतूक पुन्हा सुरू झालेली दिसत आहे. रात्रीच्या वेळेस वाहनधारकांना सदरचा लोखंडी बार आणि फलक दिसला नाही का ? असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे. याकडे जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

प्रशासनाने लक्ष देण्याची गरज…….

रात्रीच्या वेळेस येणाऱ्या वाहनधारकांवर लक्ष ठेवण्यासाठी या ठिकाणी बंदोबस्त लावण्याची गरज आहे अन्यथा अशा घटना वारंवार घडण्यास वावा मिळणार आहे. रेल्वे ब्रिज कमकुवत झाला असल्याने या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने तसेच प्रशासनाने विशेष करून रेल्वे प्रशासनाने देखील लक्ष देण्याची गरज आहे असे मत स्थानिकांमधून व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *