भगवान नगर येथील नागरिक सोसतायत नरक यातना ; मैलामिश्रित पिण्याच्या पाण्याने जीव आले धोक्यात….
नागरिक त्रस्त प्रशासन सुस्त – नरसय्या आडम मास्तर…
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि १२ ऑगस्ट – सोलापूर पोलीस मुख्यालय शेजारी असलेली भगवान नगर झोपडपट्टीचे २०१६ रोजी जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजना अंतर्गत पुनर्वसन करून पक्की घरे लाभार्थ्यांना हस्तांतरीत करण्यात आले.परंतु याठिकाणी मलनिस्सारण व्यवस्था योग्य आणि अचूक पद्धतीने न केल्यामुळे रहिवासियाना नरक यातना सहन कराव्या लागत असल्याचे विदारक चित्र आहे…
पिण्याचे पाणी नळ जोडणी आणि ड्रेनिजचे मैला मिश्रित सांडपाणी एकत्रित होऊन गढून पाणी व ड्रेनिज याचे पाणी यात फरक दिसत नाही. मलनिस्सारण व पाणी जलवाहिनी फुटल्याने रोगराई पसरली आहे.ज्या दिवशी पाणी सोडले जाते त्यावेळी संपूर्ण वस्तीत नदीला पूर आल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. यामुळे प्रत्येक घरात एक डेंग्यू मलेरिया ,हिवताप,हगवण,थंडी तापेचा रुग्ण आधळून येतो.
याबाबत वारंवार विभागीय अधिकारी कार्यालय यांच्याकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. हे अत्यंत गंभीर आहे. नागरिक त्रस्त आणि प्रशासन सुस्त असल्याची टीका ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी केली. भगवान नगर येथील नागरिकांच्या वतीने सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली – उगले यांना ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले…
यावेळी या शिष्टमंडळात माजी नगरसेविका नसीमा शेख,ॲड.अनिल वासम , वंदना भिसे, योगेश मार्गम , अंबादास बिंगी, आनंद कळसकर, मल्लेशम अल्ली, प्रशांत म्याकल, रवि केंचुगुंडी आदींची रेणुका गुंडला, सरस्वती कमुर्ती, उपस्थिती होती.