भगवान नगर झोपडपट्टीतील नागरिकांचा प्रश्न मार्गी लागणार ! नगरसेविका पूजा वाडेकर यांचा यशस्वी पाठपुरावा…

भगवान नगर झोपडपट्टीतील नागरिकांचा प्रश्न मार्गी लागणार

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर दि.२५ मार्च

न्यु पाच्छा पेठ, भगवान नगर झोपडपट्टी मध्ये ३७२ घरे आवास योजनेअंतर्गत बांधून पूर्ण झालेले आहे. परंतु सदर घरांमधील २८ घरांना कब्जा पावती देण्यात आली नाही. उर्वरीत काही घरांना स्थानिक अंतर्गत वादांमुळे देखील त्यावेळेस प्रलंबित ठेवले होते.

याबाबत नगरसेविका पूजा श्रीकांत वाडेकर यांनी महापौर विनायक कोंड्याल यांना निवेदन दिले असून, सर्व घरांना कब्जा पावती देण्यात यावी अशी मागणी केली आहे. महापौर विनायक कोंड्याल यांनी या संबंधी बैठक घेण्याचे आश्वासन नगरसेविका पूजा वाडेकर यांना दिले आहे.

त्यामुळे भगवान नगर झोपडपट्टी येथील नागरिकांचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. नागरिकांनी महापौर विनायक कोंड्याल आणि नगरसेविका पूजा वाडेकर यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *