बसवदर्शन प्रवचनमाला उत्साहात संपन्न…

लिंगायत धर्म मेळावा तसेच बसवदर्शन प्रवचनमाला उत्साहात संपन्न…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज 

सोलापूर, दि. ३ सप्टेंबर – श्रीक्षेत्र बोराळे येथे श्रावण मासामध्ये आयोजित करण्यात आलेल्या बसवदर्शन प्रवचनमालेचा समारोप जगतगुरू डॉ. चन्नबसवानंद स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला.

          कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली, सरपंच सुजाता विनोद पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले, त्यानंतर बसवमूर्ती पूजन व प्रार्थना करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रणिता भगीरथ भालके तर प्रमुख मान्यवर म्हणून सिद्धाराम चाकोते, विजयकुमार हत्तुरे, सुनील हेंगणे आदींची उपस्थिती होती.

       कार्यक्रमात अध्यक्षांनी भारत भालके यांचे बसवेश्वर महाराजांच्या स्मारकाचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी ज्येष्ठ शरण साहित्यिक डॉ. अशोक मेनकुदळे , चनविर भद्रेश्वरमठ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याच प्रमाणे समाधान आवताडे यांनी स्वामीजींचे आशीर्वाद घेत पुढील पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय बसवेश्वर स्मारक मंगळवेढ्यात उभारण्याचे आश्वासन दिले.

            यावेळी ग्रामस्थांनी स्मारक व लिंगायत धर्म ज्ञानपीठासाठी आवश्यक असलेली जमीन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला, यामध्ये बेळगाव, धारवाड, बिदर, हुबळी, बेंगलोर, विजापूर जिल्ह्यातील शरण बांधव व शरणी भजनी मंडळ सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *