बार्शी शहरात वाढला माकडांचा धुमाकूळ : अनेक नागरिकांना माकडांनी घेतला चावा , वनविभागाचे सातत्याने दुर्लक्ष

माकडांचा वाढता त्रास, वनविभागाचे दुर्लक्ष : नागरिक हैराण : बार्शी शहरातील घटना ….

 

सोलापूर व्हिजन

बार्शी दि ७ जुलै – बार्शी शहरातील लहुजी चौक येथील जयशंकर मिल परिसरात माकडांचा धुमाकूळ सुरु असून, वनविभागाच्या निष्क्रियतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.   झाडबुके मैदान भागातील नागरिकांना माकडांनी चावा घेतल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

आम्ही वारंवार तक्रार करूनही वनविभागाचे अधिकारी कारवाई करत नाहीत. आता आम्ही अधिक कठोर भूमिका घेण्याची तयारी करत आहोत,” असे एक स्थानिक महिलेने आपली व्यथा मांडली आहे. माकडांच्या हल्ल्यामुळे महिलांमध्ये आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.वनविभागाच्या निष्क्रियतेमुळे बार्शीतील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. “वनविभागाच्या अपयशामुळे आम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागत आहे. हे शासनाच्या जबाबदारीत येते, पण ते आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले आहेत,” असे स्थानिक संतप्तपणे म्हणतात. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे बार्शीतील नागरिक माकडांच्या हल्ल्याने त्रस्त झाले आहेत. वनविभागाने तातडीने कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे. “आम्ही वनविभागाच्या निष्क्रियतेविरुद्ध आवाज उठवणारच,” असा निर्धार स्थानिकांनी व्यक्त केला आहे. वनविभागाच्या निष्क्रियतेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर तातडीने तोडगा काढणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *