श्रीसंत सेना नाभिक दुकानदार संघाची अनोखी सेवा …

श्रीसंत सेना नाभिक दुकानदार संघाची अनोखी सेवा ; पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना मोफत कटिंग दाढी 

सोलापूर व्हिजन

सोलापूर दि १२ जुलै – दक्षिणकाशी संबंध येणाऱ्या तीर्थक्षेत्र पंढरपूर आषाढी वारीसाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ब्रम्हांडनायक सद्गुरु संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे.

                  पालखीचा उपलप मंगल कार्यालयात विसावा झाला. यावेळी श्री संत सेना नाभिक दुकानदार संघाच्यावतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना कटिंग दाढी याची मोफत सेवा पुरवण्यात आली.

या दिंडीत पायी आलेल्या वारकऱ्यांनी अनोख्या सेवेचा लाभ घेतला. यामध्ये वारकऱ्यांची मोफत कटिंग दाढी मसाज सेवा देऊन श्री चरणी प्रार्थना अर्पण केल्याचे संघाचे अनिल कोंडूर यांनी सांगितले. यावेळी संघाचे अध्यक्ष अभय कुमार कांती , ट्रस्टी अध्यक्ष आनंद सिंगराल , भारत शिरसागर , सिद्राम रुद्रार , गणेश जमदाडे , गोवर्धन कोडपाक  , शेखर कोंडापुरे भास्कर तमनूर, गोपाल नडीगोट्टू , राम राऊत , बापू झुंजार , श्रीनिवास रासकोंडा आदींनी सेवा अर्पण केली.

 

सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील श्री संत सेना नाभिक दुकानदार संघ सेवाभावी संस्थेच्या वतीने श्री संत गजानन महाराज पालखीतील वारकऱ्यांसाठी मोफत दाढी व कटिंग सेवा अर्पण केली जाते यावर्षी देखील मोठ्या उत्साहात ही सेवा अर्पण केली आणि श्री चरणी प्रार्थना करून सर्वांवर सुख समृद्धी आणि आशीर्वाद राहू दे असे मागणे मागितले. 

– अनिल कोंडुर , श्री संत सेना नाभिक दुकानदार संघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *