सी.एस.आर.निधीतून ५३ शाळांना विविध शालेय साहित्याचे झाले थाटात वितरण…
सोलापूर व्हिजन
सोलापूर दी २५ जुलै – बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकलच्या सी.एस.आर निधीतून सोलापूर तसेच उस्मानाबाद शहर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि महापालिका शाळांना विविध शैक्षणिक साहित्य तसेच भौतिक सुविधांचा संच यांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी महापालिकेच्या आयुक्त शितल तेली उगले या बोलत होत्या.
महापालिका केवळ बांधकाम करते किंवा रोड तयार करते, मात्र राम रेड्डी यांनी अनेक पिढ्या घडवण्याचे काम चांगल्या प्रकारे केले आहे. डी. राम रेड्डी यांनी महापालिकेच्या अखत्यारीतील एखादे हॉस्पिटल पुन्हा एकदा नूतनीकरण करण्यासाठी आपल्या हाती घ्यावे आणि त्याचा कायापालट करावा, त्यासाठी महापालिका प्रशासन सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. एखादी नवीन वास्तू सी.एस.आर निधीतून उभारल्यास त्याचा फायदा जनतेला होणार आहे. त्यामुळे सोलापूरचे नाव जगाच्या नकाशात अधोरेखित केले जाईल, असे सांगत काही माणसे केवळ पैसे कमावतात तर काहीजण पैशाच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कर्मभूमीसाठी खर्च करतात त्यांचे नाव आबाधीत राहते त्यापैकी एक राम रेड्डी आहेत. त्यामुळे दिलेले शैक्षणिक साहित्याचा चांगला उपयोग करावा, विद्यार्थ्यांनी त्याचा गैरवापर टाळावा, दिलेल्या वस्तुसाठी सतपात्री राहावे असे आवाहन देखील यावेळी उगले यांनी केले.
सदरचा कार्यक्रम बालाजी सरोवर प्रीमियर हॉटेल सोलापूर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर बालाजी केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रसिद्धी अधिकारी अंकुश चव्हाण , प्रसिद्ध नेत्र तज्ञ तथा स्वतंत्र संचालक डॉ.उमा प्रधान , स्वतंत्र संचालक राजन तापडिया , बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी.राम रेड्डी , सी.एस.आर विभाग प्रमुख तथा तांत्रिक सल्लागार मल्लिनाथ बिराजदार आदींची उपस्थिती होती. यावेळी श्री गणेशाचे पूजन आणि दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख मान्यवर अंकुश चव्हाण यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना बालाजी अमाईन्सचे राम रेड्डी यांनी दिलेल्या संधीचे सर्व विद्यार्थ्यांनी सोने करावे, दिलेल्या विविध वस्तूंच्या माध्यमातून आपली गुणवत्ता सिद्ध करावी आणि उच्च पदावर कार्यरत व्हावे असे आवाहन करत ज्या शाळेला ज्याची गरज आहे त्या जायला ते वस्तू चांगल्या पद्धतीने सुपूर्द केल्याबद्दल राम रेड्डी यांचे देखील कौतुक केले.
कार्यक्रमातील मान्यवर डॉ उमा प्रधान यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना राम रेड्डी यांच्या सहकार्य करण्याच्या वृत्तीचे कौतुक केले. जुन्या आठवणींना उजाळा देत बॅकवर्ड वस्तीगृहासाठी मदत केल्याबद्दल आभार मानले.
दरम्यान सोलापूर शहर व जिल्हा तसेच उस्मानाबाद शहर व जिल्हा या ठिकाणाहून आलेल्या सुमारे ५३ झेडपी तसेच महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांना स्मार्ट टीव्ही, आर.ओ. प्लांट, वैज्ञानिक साहित्याचे संच, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंचेस , कॉम्प्युटर संच आदींसह स्वच्छतागृह , पिण्याच्या टाक्या , अशा भौतिक सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यावेळी कार्यक्रमात शालेय साहित्याचे वितरण प्रमुख मान्यवर आयुक्त शितल तेली उगले , केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रसिद्धी अधिकारी अंकुश चव्हाण डॉ. उमा प्रधान , स्वतंत्र संचालक राजन तापडिया आदी मान्यवरांच्या हस्ते विविध शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षकांना करण्यात आले.
तत्पूर्वी कार्यक्रमात बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी.राम रेड्डी यांनी आपले प्रास्ताविक व्यक्त करताना बालाजी स्पेशालिटी केमिकल लि. कंपनीचे महत्व अधोरेखित केले. रेड्डी म्हणाले की, बालाजी स्पेशलिटी केमिकल लि. कंपनीअशी मान्यता मिळाली आहे. जगातील विविध नामांकित कंपनीशी बालाजी स्पेशालिटी केमिकलची स्पर्धा होते. भारतीय विज्ञान आणि टेक्नॉलॉजी मंत्रालयाची बालाजी स्पेशलिटी केमिकल्स लिमिटेड कंपनीला विशेष मान्यता देण्यात आली आहे.
कार्यक्रमात लाभार्थी शाळेचे शिक्षक सिद्धाराम माशाळे जिल्हा परिषद शाळा अंबिकानगर बाळे , प्रकाश राचेटी जिल्हा परिषद शाळा मजरेवाडी होडगी रोड , तसेच शिंगडगावच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी मनस्वी बडूरे हिने देखील आपले मनोगत व्यक्त करताना राम रेड्डी यांच्या कार्याचे कौतुक केले. प्रारंभी कार्यक्रमात चित्रफितीच्या माध्यमातून बालाजी अमाईन्स आणि स्पेशलिटी केमिकल लिमिटेड कंपनीने केलेल्या कार्याची माहिती दाखवण्यात आली. यावेळी सोलापूर तसेच तुळजापूर इथल्या झेडपी आणि महापालिका शाळेचे विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बालाजी अमाईन्सचे राम रेड्डी यांचे नाव सर्वत्र पोहोचले आहे त्यांच्या या कार्यामुळे शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात चांगले बदल झाले आहेत. मागील वर्षी महापालिकेचे डफरीन हॉस्पिटलचे रूपांतरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृह असे मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटल सारखेच झाले आहे. रेड्डी यांनी विविध अत्याधुनिक सोयी सुविधा आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात दिल्या आहेत. यापुढे देखील त्यांनी हे कार्य असेच सुरू ठेवावे ही शुभेच्छा.
– शितल तेली उगले, सोलापूर महापालिका आयुक्त.
दरवर्षी सी.एस. आर निधीतून सुमारे लाखो कोटी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र यावर्षी सुमारे आठ कोटी इतका सी.एस.आर निधी खर्च केला असून भविष्यात तो दहा कोटी पर्यंत जाऊ शकतो. शालेय साहित्य वितरण व्यवस्थामध्ये ज्या शाळेला ज्या वस्तूची गरज आहे, त्या वस्तूची पूर्तता तंतोतंत पद्धतीने केली जात आहे. त्यामुळे त्या वस्तूचे उपयोग विद्यार्थ्यांना आणि शाळेला होत आहे.
– डी.राम रेड्डी , व्यवस्थापकीय संचालक बालाजी अमाईन्स लि.