बागेश्वर धामचे पिठाधीश धीरेंद्र शास्त्री यांचे उद्या होम मैदानावर संतसंमेलन !
तमाम सोलापूरकरांनी उपस्थित राहण्याचे मसापा दक्षिण शाखेचे आवाहन…..
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्यूज,
सोलापूर, दि. १२ नोव्हेंबर-
श्री बागेश्वर धाम सेवा समिती महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने बुधवार १३ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता होम मैदानावर बागेश्वरधामचे पिठाधीश पंडीत धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांचे संतसंमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती मसाप दक्षिण शाखेच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर आणि कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिली.
आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे मध्यप्रदेशातील छतरपूर मधील बागेश्वरधामचे मठाधिश आहेत. जगभरात त्यांची भक्तमंडळी मोठ्याप्रमाणात असून ते पर्चीबाबा म्हणून प्रसिध्द आहेत. देशात आणि जगभरात त्यांचा दिव्यदरबार मोठ्याप्रमाणात भरतो. जगाचे कल्याण केवळ सनातन हिंदु धर्मच करू शकतो आणि संपूर्ण विश्वात कोणत्याही जाती धर्मात भेदभाव असू नये असे ते नेहमी आपल्या प्रवचनातून सांगत असतात. मुलींना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे, असे क्रांतीकारी विचारही त्यांनी मांडले आहे. त्यांना बागेश्वरधाम सरकार म्हणूनही संबोधले जाते. अनेकांच्या मनातील सम स्या जाणून त्यावर उपायही त्यांनी सांगितल्याने बागेश्वर धाम सरकार यांच्या भक्तांमध्ये मोठी वाढ होत आहे. पर्चीवाले बाबा म्हणूनही भाविकांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढत आहे. त्यांचे दर्शन सोलापूरकरांना व्हावे यासाठी सोलापूरकरांनी मोठ्यासंख्येने याचा लाभ घ्यावा हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य खुला आहे असे आवाहन श्री बागेश्वर धाम सेवा समितीचे सोलापूर जिल्हा संयोजक अक्षय अंजिखाने आणि शहर संयोजक संजय साळुंखे यांनी केले.