काँग्रेस विमुक्त जाती व भटक्या जमाती विभाग शहराध्यक्ष युवराज जाधव यांची निवडीनंतर प्रतिक्रिया…
सोलापूर व्हिजन
सोलापूर दी १३ ऑगस्ट – सोलापूर शहर काँग्रेस विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाच्या शहराध्यक्षपदी युवराज जाधव यांची निवड करण्यात आली, त्यांचे निवडीचे पत्र खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. मागील अनेक वर्षापासून युवराज जाधव हे काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय असून प्रामाणिक आणि एकनिष्ठपणे काम करत आहेत आमदार प्रणिती शिंदे यांच्या तीनही विधानसभा निवडणुकांमध्ये तसेच लोकसभा निवडणुकीत आपल्या भागातून जाधव यांनी चांगले मताधिक्य दिले होते.
दरम्यान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाचे अध्यक्ष अँड पल्लवी बाळकृष्ण रेणके यांनी सोलापूर शहर काँग्रेस विमुक्त जाती व भटक्या जमात विभागाच्या अध्यक्षपदी युवराज जाधव यांची निवड केली आहे.
यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, डी ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड, दक्षिण सोलापूरचे नेते सुरेश हसापुरे, कैकाडी समाज अध्यक्ष गोपाळ नंदुरकर, प्रा.भोजराज पवार , प्रदेश सरचिटणीस सुभाष चव्हाण, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले, प्रदेश सचिव भीमराव बंडगर, टकारी समाज सरपंच नारायण जाधव, प्रदेश संघटक मल्लेश सूर्यवंशी, डी ब्लॉक अध्यक्ष संजय गायकवाड, व्ही.जे.एन. टी. महिला शहराध्यक्ष अंजली मंगोडेकर आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
विमुक्त जाती आणि भटक्या जमातीचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू……..
काँग्रेस पक्षात गेल्या पंधरा वर्षांपासून कार्य करत आहे. पक्षात विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागातील अनेक विमुक्त आणि भटक्या समाजासाठी विशेषत्वाने अनेक वर्षांपासून कार्य करत आहे. हे कार्य असेच सुरू ठेवणार आहे. भटक्या आणि विमुक्त जमातीसाठी गृहनिर्माण प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न सुरू असून त्याद्वारे विमुक्त आणि भटक्या समाजाला घरे मिळवून देऊ. त्याचप्रमाणे भटक्या आणि विमुक्त जमातीतील मुले शिक्षणापासून वंचित आहेत अशा मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. तारेच्या कुंपणातील नऊ समाजाचा विकास करणे हे ध्येय असणार आहे.
– युवराज जाधव , नूतन शहराध्यक्ष काँग्रेस विमुक्त जाती व भटक्या जमाती विभाग सोलापूर.