प्रहारचे उमेदवार बाबा मिस्त्री यांचा दक्षिण मध्ये प्रचाराचा एकच झंझावात …
बाबा मिस्त्रींची दक्षिण मध्ये वाढली क्रेझ
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१६ नोव्हेंबर –
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार मौलाली सय्यद उर्फ बाबा मिस्त्री यांनी होम टू होम प्रचार केला. एका दिवसात त्यांनी वीस गावांना भेटी देण्याचा झंजावती प्रचार दुसऱ्या दिवशी सुरूच ठेवला. प्रत्येक गावात बाबा मिस्त्री यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.यतनाळ, होटगी, इंगळगी, हिपळे, फताटेवाडी, बंकलगी, होटगी स्टेशन, संजवड, बरूर, हत्तरसंग कुडल, टाकळी माळकवठा कारकल लवंगी बाळगी बेलगाव खानापूर कुसुर आधी गावातून त्यांचा प्रचार संपन्न झाला.
दरम्यान पदयात्रा होम टू होम कॉर्नर बैठका गाव भेट करत बाबा मिस्त्री हे प्रचारात आघाडी घेत आहेत. या प्रचारात त्यांच्यासोबत यल्लप्पा कोंडी शिवानंद कोडी मोहम्मद मुल्ला पैगंबर मुल्ला सुरेश कोळी तुकाराम शेजाळे पैगंबर आदी उपस्थित होते.
बाबा मिस्त्री यांचा सर्व समावेशक चेहरा…
बाबा मिस्त्री यांच्याकडे सर्वसामावशक चेहरा म्हणून पाहिले जाते. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्ण सेवा करत त्यांनी कधीही जातीभेद धर्मपंथ मानला नाही. या निवडणुकीत हेच मुद्दे घेऊन प्रचारात आघाडी घेतलेली दिसत आहे. हिंदू असू दे किंवा मुस्लिम प्रत्येक गल्लीत कॉलनीत त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.