भाजपचा पराभव अटळ !भाजपच्या बालेकिल्यात महेश कोठेंची सिंहगर्जना 

यंदा भाजपचा पराभव अटळ !भाजपच्या बालेकिल्यात महेश कोठेंची सिंहगर्जना..

ठिकठिकाणी झाले महेश कोठे यांचे जोरदार स्वागत….

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.७ नोव्हेंबर – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांची पदयात्रा गुरुवारी सकाळी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग आठ येथून काढण्यात आली.

यावेळी नागरिकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी ठिकठिकाणी महेश कोठे यांचा नागरिकांकडून सत्कार करण्यात आले.अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करून महेश कोठे यांचे स्वागत करण्यात आले, शहर उत्तर विधानसभा मतदार संघातून महेश कोठे यांना मोठया प्रमाणात पाठींबा मिळत आहे.

पदयात्रेस दत्त चौक येथून सुरुवात होऊन माणिक चौक, विजापूर वेस, बारा इमाम चौक, सोमवार पेठ, शंकरलिंग मंदिर, साखर पेठ, औद्योगिक बँक, कंन्ना चौक मार्गे काढून कौतम चौक येथे समारोप करण्यात आला.

चिमुकल्या बालगोपाळांना महेश कोठेंशी हस्तांदोलन करण्याचा मोह आवरता आला नाही.

गेल्या वीस वर्षांत विकासकामे न झाल्याने मालकांचे कार्यकर्ते हिंदू मुस्लिम करत असून विकासाच्या मुद्यावर कोणीलाही बोलता येत नाही, त्यामुळे यंदा शहर उत्तर मध्ये परिवर्तन अटळ असून यंदा शहर उत्तर मध्ये तुतारी वाजणार असा विश्वास महेश कोठे यांनी व्यक्त केला.

यावेळी उदय चाकोते, संजय शिंदे, राजू कुरेशी, प्रथमेश कोठे, सरफराज शेख यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *