शहरातील प्रभाग ३ भाजपचा गड ; भाजपला मिळणार प्लस पॉइंट
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.९ नोव्हेंबर – महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक तीन मध्ये शनिवारी सकाळी उस्फुर्तपणे पदयात्रा काढण्यात आली.प्रभाग क्रमांक तीन मध्ये आमदार देशमुख यांच्या माध्यमातून मूलभूत सोयी सुविधा करिता शेकडो कोटींची कामे झाली असून भाजपचा गड असलेल्या भागात भरघोस निधी दिल्यामुळे मतदानही भरघोस होईल असा विश्वास माझी सभागृह नेते संजय कोळी यांनी व्यक्त केला.
ढोर गल्ली, दाळगे प्लॉट, शाहीर वस्ती, भवानी पेठ, मुनाळे बोळ, आणि प्रभाग तीन मधील उर्वरित भागात आमदार देशमुख यांनी निधी दिल्यामुळे या भागाचा कायापालट झाला आहे. अनेक वर्षापासून समस्या येथे सुटल्यामुळे हा भाग भाजपचा गड मानला जातो. येणाऱ्या निवडणुकीत शहर उत्तर मध्ये सर्वाधिक मताधिक्य देण्याचा संकल्प या भागातील भाजपचे बाळासाहेब आळसंदे, राजा गायकवाड, नागेश येळमेली आणि श्रीकांत हवळगी यांनी व्यक्त केला.
या पदयात्रेमध्ये अजित गायकवाड, जागृती माता संस्थेचे ट्रस्टी सिद्धू गुब्याडकर, गौतम कसबे, वीरेश गुंडगे, शिवानंद साबळे गुरुनाथ बडूरे, प्रेम भोगडे आदीं सहभागी होते…