हमाल – माथाडी – मापाडी कामगार आक्रमक ; प्रशासनाला देणार सोमवार पर्यंतचा अल्टिमेटम…

हमाल – माथाडी – मापाडी कामगारांनी प्रशासनाला देणार  अल्टिमेटम…

टप्पा दुरुस्तीचा ठराव रद्द न केल्यास सोमवार पासून कामबंदचा ईशारा..

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज , 

सोलापूर , दि. ४ सप्टेंबर – सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत असणाऱ्या हमाल मापडी कामगारांनी आंदोलन आता तीव्र स्वरूपाचे केले आहे. टप्पा दुरुस्तीचा ठराव रद्द करण्याच्या मागणीकडे प्रशासन गांभीर्याने विचार करत नसल्याने, बाजार समितीत कार्यरत असणाऱ्या सोलापूर जिल्हा हमाल , मापाडी , माथाडी श्रमजीवी कामगार समन्वय समितीने आता बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे..

          दरम्यान आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी  हमाल , मापडी , माथाडी श्रमजीवी कामगार समन्वय समितीने प्रशासनाला सोमवार ( दि. ९ ) सप्टेंबर पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. बाजार समिती प्रशासकीय कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय, कामगार आयुक्त कार्यालय, या प्रशासकीय कार्यालयांना यासंबंधीचे पत्रव्यवहार करून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वरिष्ठ पातळीवरून देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने संयुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे.

शासन आणि प्रशासनाला अल्टिमेटम

शासन आणि प्रशासन कामगारांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. आंदोलन सुरू करून आठ दिवस उलटले तरी देखील यावर निर्णय होत नाही. आता वेळ संपत आली आहे. टप्पा दुरुस्तीचा ठराव रद्द न केल्यास आंदोलन अधिक उग्र आणि तीव्र स्वरूपाचे होईल त्या सर्वस्वी शासन प्रशासन जबाबदार राहिले.

– भिमा सिताफळे, उपाध्यक्ष कामगार समन्वय समिती सोलापूर.

कामगारांच्या प्रमुख मागण्या

– भुसार बाजाराकरीता लागू करण्यात आलेला टप्पा दुरुस्तीचा ठराव रद्द झाला पाहिजे. 

– संपूर्ण माथाडी कामगाराच्या हमाली तोलाई चा भरणा माथाडी बोर्डात झाला पाहिजे.

– माथाडी कामगाराकरीता घरकुल व प्राथमिक उपचार केंद्र झालेच पाहिजे.

– कांदा विभागामधील माल राखणे बंधनकारक करु नये.

   यावेळी समितीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, संचालक शिवानंद पुजारी, उपाध्यक्ष भिमा सिताफळे, अध्यक्ष सिध्दाराम हिप्परगी,  सचिव दत्ता मुरुमकर, विशाल मस्के, शिवलिंग शिवपुरे, सचिन बहिरजे, अण्णा कांबळे, मुग्यप्पा धनोरे, किरण मस्के आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *