श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती नावाने ओळखणार मार्केट यार्ड
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नामकरण झाले श्रीसिद्धेश्वर या नावाने
माझ्या सभापती काळात नामकरण म्हणजेच सिद्धरामेश्वरांचा आशीर्वादच होय – सभापती दिलीप माने
सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूर, दि.३ जुलै
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नावांमध्ये बदल करून ते नाव ”श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर”असे करण्यात यावे अशी मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून प्रलंबित होती. सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धरामेश्वराच्या नावाचा आग्रह गेल्या अनेक वर्षापासून सभासद,व्यापारी व शेतकरी वर्गाने धरला होता. यानामांतराला १७ सप्टेंबर २०२२ रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठराव घेऊन प्रस्ताव सादर केला होता. २८ मे २०२५ रोजी यास प्रशासकीय मान्यता मिळाली, असून यापुढे ”श्रीसिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर’ असे मार्केट यार्डचे नामकरण करण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी दिली.
श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाव राज्यामध्ये अव्वलस्थानी असून बाजार समितीचे सभासद, व्यापारी, शेतकरी व संचालक मंडळाच्या मागणीनुसार सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाव बदलण्यात आले आहे .या नामकरणास जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी मंजुरी दिल्याने बाजार समितीमध्ये सभासद अडते व शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.
नावामध्ये बदल करण्याचा ठराव १७ सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता.तसेच २४ जानेवारी २०२५ रोजीचा प्रशासकीय निर्णय क्रमांक १२ अन्वये जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम १९६३ च्या त्याखालील नियम १९६७ मधील तरतूद अन्वये श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर असे नामकरण करण्याचा आदेश दिला आहे.

माझ्या सभापतीपदाच्या कार्यकाळात नामकरण म्हणजेच सिद्धरामेश्वरांचा आशीर्वादच होय
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नावामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव प्रलंबित होता. मात्र सततच्या पाठपुराव्यानंतर तो प्रस्ताव मंजूर झाला असून माझ्या सभापती कालावधीमध्ये श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर असे नामकरण झाले आहे हे नामकरण माझ्या काळात झाल्यामुळे मला सिद्धेरामेश्वराचा आशीर्वाद मिळाल्याची भावना आहे.
दिलीप माने सभापती श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर.
नावात बदल निर्णय अभिनंदनीय
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नावामध्ये श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती असा बदल करण्यात आलेला आहे तो बदल सभासद शेतकरी आणि व्यापारी यांच्या दृष्टिकोनातूनअभिनंदनिय आहे.गेल्या अनेक वर्षांच्या मागणीला आता यश आले आहे.
ज्ञानोबा साखरे, शेतकरी साखरेवाडी
बाजार समितीचे प्रवेशद्वारावरील नवीन नावाचा फलक लावण्यात यावा.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नामकरण श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती असे झाले आहे. मात्र बाजार समितीचे मुख्य प्रवेशद्वार गेल्या अनेक वर्षापासून दुरुस्त केलेले नाही. ते आकर्षित करून नामकरानाचा फलक तेथे लावण्यात यावा.
शहाजी भोसले, शेतकरी गुळवंची